‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम. आपल्या विनोदाने अनेक प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या, सर्वांच्या लाडक्या भाऊचा काल २ मार्च रोजी वाढदिवस होता. त्या निमित्ताने भाऊच्या कुटुंबीयांनी सरप्राइज बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. या सरप्राइज बर्थडे पार्टीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नुकताच भाऊ कदम यांनी वयाची ५० वर्षे ओलांडली आहेत. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी ढोलताशाच्या गजरात त्यांचा वाढदिवस साजरा केला. या पार्टीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यातील दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टीचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘५०व्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा भाऊ कदम… असाच महाराष्ट्राला आनंद देत राहा मित्रा..’ असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
Happy 50th Birthday dear Bhau Kadam!!! असाच महाराष्ट्राला आनंद देत रहा मित्रा
आणखी वाचा : ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल भाऊ कदम रॉक्स!
भाऊ कदम यांना तीन मुली आहेत. ते त्यांच्या व्यग्र वेळपत्रकातून वेळ काढून पत्नी ममता आणि मुली मृण्मयी, संचिती, समृद्धी यांना वेळ देत असतात. इतके यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदम यांच्यामधील साधेपणा आजही कायम आहे. त्यामुळेच साधे राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत.