‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘जाने तू या जाने ना’, ‘जुनून’, ‘आक्रोश’, ‘चक्र’, ‘मौसम’, ‘द डर्टी पिंक्चर’, ‘सरफरोश’, ‘कर्मा’, ‘जाने भी दो यारो’, ‘इक्बाल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज २० जुलै रोजी वाढदिवस. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले आहे. त्याचसोबत त्यांनी चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. जवळपास ४५ वर्षांहून अधिकाळ इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या नसीरुद्दीन यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे माहितीये का? चला जाणून घेऊया…
‘रिपब्लिक’ने दिलेल्या वृत्तानुसार नसीरुद्दीन शाह यांच्याकडे एकूण ३७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. नाटक, चित्रपट आणि जाहिराती हे त्यांच्या उपन्नाचे स्त्रोत असल्याचे म्हटले जाते. नसीरुद्दीन शाह यांना तिन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ‘स्पर्श’, ‘पर’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ‘इक्बाल’ चित्रपटात सहाय्यक अभिनेता म्हणून देखील २००६मध्ये राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.
View this post on Instagram
रुपवेध प्रतिष्ठानचा २०१९ चा तन्वीर पुरस्कार देखील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना जाहीर करण्यात आला होता. आजवर नसीरुद्दीन शाह यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नसीरुद्दीन यांनी पाकिस्तानी चित्रपट ‘जिंदा भाग’मध्ये देखील काम केले आहे हे फार कमी लोकांना माहित आहे.
नसीरुद्दीन यांनी वयाच्या २० व्या वर्षी पहिले लग्न केले होते. त्यांची पहिली पत्नी मनारा सिकरी ऊर्फ परवीन मुराद या त्यांच्यापेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठ्या होत्या. परंतु, त्यांचे लग्न वर्षभरदेखील टिकू शकले नाही. त्यानंतर नसीरुद्दीन यांनी रत्ना पाठक यांच्यासोबत लग्न केले. या दोघांना इमाद आणि विवान अशी दोन मुले आहेत.