‘सावरिया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेता रणबीर कपूरने नेहमीच त्याच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पदार्पणापासूनच ‘चॉकलेट बॉय’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रणबीरभोवती चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला. मुख्य म्हणजे त्याच्या फिमेल फॅन फॉलोअर्सचा आकडा तुलनेने जास्तच. असा हा ‘रॉकस्टार’ रणबीर लवकरच संजय दत्तच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी तो सध्या बरीच मेहनत घेत असून, नुकताच सोशल मीडियावर त्याचा एक फोटो चर्चेचा विषय ठरतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा फोटो रणबीरच्या आगामी चित्रपटातील नसून, जाहिरातीच्या निमित्ताने रणबीरची या मॉ़डेलसोबतची हॉट केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. अंतर्वस्त्रांच्या एका जाहिरातीमध्ये स्क्रिप्टच्या अनुषंगाने रणबीर आणि त्या मॉडेलची केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या जाहिरातीत रणबीरच्या शरीरयष्टीवरही अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक अॅब्सचा ट्रेंड आला तेव्हापासूनच अभिनेता संजय दत्तच्या शरीरयष्टीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. त्याचप्रमाणेच या जाहिरातीतील रणबीरची एकंदर शरीरयष्टी पुन्हा पुन्हा संजूबाबाचीच आठवण करुन देत आहे. ९०च्या दशकात संजूबाबाचे चित्रपट आणि त्याचं खासगी आयुष्यही बरंच चर्चेत होतं. यावरच प्रकाश टाकत दिग्दर्शक राजकुमार हिरानी संजय दत्तचा जीवनपट रुपेरी पडद्यावर साकारत आहेत. या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण पूर्ण झालं असून, चित्रीकरणातूनच वेळ काढत रणबीर काही दिवसांपूर्वी लंडनला रवाना झाला होता. आई नीतू कपूरसोबत लंडनला गेलेल्या रणबीरसाठी तिकडचीच मुलगी पसंत करण्यात आल्याच्या चर्चांनाही बरंच उधाण आलं होतं.

नेहमीच चर्चेत असलेलं रणबीरचं खासगी आयुष्य आता नव्याने चर्चेत आलं आहे. चित्रपटसृष्टीत बऱ्याच सेलिब्रिटींच्या लग्नाचे वारे वाहत असताना आता हा ‘चॉकलेट बॉय’ त्याच्या आयुष्यातील नव्या वळणावर पाऊल ठेवणार का, हे जाणून घेण्यासाठीच अनेकांमध्ये उत्सुकतेचं वातावरणही पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ranbir kapoor is getting cosy with this actress hot pics sanjay dutt biopic
First published on: 16-05-2017 at 11:44 IST