Dhadak Trailer. ‘सैराट झालं जीsssss…’ असं म्हणत जवळपास दोन वर्षांपूर्वी आर्ची आणि परश्या प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाच्या निमित्ताने आर्ची- परश्याची एक वेगळी प्रेमकथा आणि समाजातील दाहक वास्तव प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या दमदार कथानकामुळे ‘सैराट’ खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरला. अगदी राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत या चित्रपटाने बाजी मारली. इतकच नव्हे तर, हिंदी चित्रपटसृष्टीतही ‘सैराट’ची हवा पाहायला मिळाली ज्यानंतर करण जोहरने त्याच्या निर्मिती संस्थेअंतर्गत म्हणजे धर्मा प्रॉडक्शन या बँनरअंतर्गत ‘सैराट’चा रिमेक करण्याचा निर्णय घेतला.

करण जोहरची निर्मिती आणि शशांक खैतानच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या ‘धडक’ या ‘सैराट’च्या हिंदी रिमेकसाठी जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या दोन स्टार किड्सची निवड करण्यात आली. या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण, त्याविषयी जितकी उत्सुकता पाहायला मिळाली होती, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तिच उत्सुकता कायम राहिली नाही. झी स्टुडिओजच्या अधिकृत फेसबुक अकांऊंटवरुन आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करण्यात आला. ज्यानंतर अनेक चाहत्यांनी त्याची तुलना ‘सैराट’शी करण्यास सुरुवात केली.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!

वाचा : Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

ट्रेलरच्या प्रत्येक दृश्यात मराठी आणि अमराठी प्रेक्षकांना राहून राहून ‘सैराट’चीच आठवण झाल्याचं त्यांच्या कमेंट वाचून लक्षात आलं. काही नेटकऱ्यांनी रिमेक या संकल्पनेविषयीच निराशा व्यक्त केली. तर काही अमराठी प्रेक्षकांनी ‘सैराट’च्या कथानकापासून त्याच्या दिग्दर्शनापर्यंत प्रत्येत गोष्टीची प्रशंसा करत करण जोहर आणि त्याच्या टीमला तिच जादू कायम ठेवणं जमलेलं नाही असंट स्पष्ट केलं आहे. जान्हवी, इशानच्या अभिनयातूनही निरागस प्रेमाची भावना पाहायला मिळत नसल्यामुळे ‘धडक’च्या Dhadak Trailer ट्रेलरने काही प्रेक्षकांची निराशा केली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

जान्हवी कपूर या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदी चित्रपटविश्वात पदार्पण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी सर्वार्थाने महत्त्वाचा ठरणार यात शंकाच नाही. दरम्यान, ‘धडक’चा ट्रेलर पाहिल्यानंतर कलाविश्वात ‘सैराट’चेच स्वैर वारे वाहात आहेत. त्यामुळे ‘सैराट’चीच जादू आजही प्रेक्षकांवर कायम आहे, हे मात्र तितकच खरं.