‘रईस’ चित्रपटातून शाहरुखसोबत स्क्रीन शेअर करणारी पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण रणबीर कपूरसोबतचं तिचं नात नसून, एका दुसऱ्याच कारणामुळे तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या तिचा सोशल मीडियावर एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये माहिरा व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेली असता तिला संकोचलेपणाचा सामना करावा लागल्याचं पाहायला मिळालं.
१७ व्या लक्स स्टाइल अवॉर्ड्समध्ये माहिराला ‘वर्ना’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आलेल्या माहिराने पुरस्कार देण्यासाठी आलेल्या अभिनेत्री मावरा होकेन आणि जावेद शेख यांची गळाभेट घेतली. पण, जावेद शेख यांची गळाभेट घेतेवेळी माहिरा काहीशी संकोचलेली दिसली. मुख्य म्हणजे त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्यांपैकी अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यातही सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्यासंदर्भातील चर्चा रंगण्यासही सुरुवात झाली. अभिनेते जावेद शेख यांच्यापासून दूर जाऊ पाहणाऱ्या माहिराला पाहा, अशा आशयाच्या विनोदी प्रतिक्रियासुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या.
Congratulations my favourite @TheMahiraKhan for winning the best actor award for #Verna you truly deserve it and I love you a lot #MahiraKhan #LSA2018 pic.twitter.com/Il5skyFZ1H
— Deep Basu (@deepbasu1) February 21, 2018
VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला
हा सर्व प्रकार पाहता माहिराने एक ट्विट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. ‘सकाळी उठले तेव्हा या वायफळ चर्चा माझ्यापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गोष्टीविषयी सजग असणं हे कधीही चांगलंच आहे. पण, निदान प्रत्येक गोष्टीची बातमी करण्याचा अट्टहास तरी करु नका. जावेद शेख हे इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते असून, आम्हा सर्वांचे ते आदर्श आहेत’, असं ट्विट करत माहिराने या सर्व प्रकरणावर संताप व्यक्त केला. माहिराने या प्रकरणात काही गोष्टी या एका ट्विटमधून स्पष्ट केल्या असल्या तरीही व्हायरल व्हिडिओमुळे प्रत्येकाने आपले अंदाज बांधले आहेत हेच खरे.
वाचा : VIDEO : तरुणाईला वेड लावणाऱ्या प्रियाचं ‘ते’ भुवई उंचावणं चोरीचं?
I have just woken up to such silly stuff floating around. It’s good to be aware and have an opinion but for Gods sake don’t use anything and everything to make news. Javed Sheikh of all people! He is a legend and a mentor to all of us in this industry. Would vouch for him always.
— Mahira Khan (@TheMahiraKhan) February 21, 2018