Premium

अभिनयापासून दुरावले, चहा अन् तिकिटंही विकली; प्रसिद्ध अभिनेत्याने आठवले संघर्षाचे दिवस, म्हणाले…

“मी एनएसडीपासून मनोज बाजपेयीला…”, अभिनेते विपीन शर्मा यांचा खुलास

vipin sharma struggle
विपीन शर्मांचा सिनेसृष्टीत येण्याचा प्रवास

सिनेसृष्टीत काम मिळविण्यासाठी नवख्या कलाकारांना खूप संघर्ष करावा लागतो. कलाक्षेत्रातील कौटुंबीक पार्श्वभूमी नसेल तर अनेकांचा या इंडस्ट्रीत निभाव लागत नाही. यामुळे काही कलाकार आपली स्वप्न पूर्ण न करताच सिनेसृष्टी सोडतात, तर काही मात्र वाटेत येईल ते काम करून, संघर्ष करून काम मिळवतात. आज अशाच एका अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या अभिनेत्याचं नाव विपीन शर्मा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विपीन शर्मा यांना तुम्ही ‘तारे जमीं पर’, ‘पान सिंग तोमर’, ‘बेबाक’, ‘इन्कार’, ‘हड्डी’, ‘एक ही बंदा काफी है’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. विपीन यांचा सिनेसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. एकवेळ अशी होती की त्यांना चहा व चित्रपटाची तिकीटं विकावी लागली होती. ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना त्यांनी त्यांचा संघर्ष सांगितला. तसेच मनोज बाजपेयी त्यांचे चांगले मित्र असल्याचा खुलासाही त्यांनी केला.

अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही श्रीमंत आहेत त्यांचे जावई, जाणून घ्या श्वेता बच्चनचे पती निखिल नंदाविषयी

विपीन शर्मा म्हणाले, “एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) सोडल्यानंतर मी अभिनय करायला सुरुवात केली, पण मला वाटलं की मी अभिनेता नाही. मी अनेक नाटकांमध्येही काम केलं. नंतर बराच काळ मी अभिनयापासून दुरावलो. पण मग मी याबद्दल खोलवर विचार केला आणि आता फक्त अभिनय करेन, असा निर्णय घेतला. हे खरं आहे की सुरुवातीच्या काळात आमचा थिएटर ग्रुप बॉक्स ऑफिसच्या बाहेर चहा विकायला आणि तिकीटं विकायला बसायचा. पण मागच्या बऱ्याच काळापासून मी दिल्लीला गेलो नाही आणि एनएसडीच्या संपर्कातही नाही.”

“ते मोकळ्या स्वभावाचे नाहीत”, शिवाजी साटम यांच्याबद्दल सूनेचं वक्तव्य; म्हणाली, “माझ्या सासऱ्यांचं घरात…”

विपीन सध्या मनोज बाजपेयी यांच्याबरोबर ‘भैयाजी’ चित्रपटात काम करत आहेत. “मी एनएसडीपासून मनोज बाजपेयीला ओळखतो. त्याने बॅरी जॉनबरोबर एक नाटक केलं होतं, त्यासाठी मी लाइट डिझाइन केले होते. आम्ही तेव्हापासूनच जवळचे मित्र आहोत. यामुळे प्रत्येक वेळी त्याच्यासोबत काम करताना आनंद होतो,” असं विपीन म्हणाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor vipin sharma recalls struggle days says sold tea and tickets hrc

First published on: 29-11-2023 at 18:07 IST
Next Story
सलमान खानशी खोटं बोलला ओरी, ‘त्या’ विधानावरून घेतली माघार; म्हणाला, “मुंबईमध्ये एखाद्या श्वानासारखं…”