बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यात शाहरुख बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोणसह रोमान्स करताना दिसत आहे. दीपिकाने गाण्यात भगव्या रंगाची बिकीनी परिधान करुन रोमान्स केल्यामुळे या गाण्यावरुन वादंग उठलं आहे.

हा वाद एकीकडे सुरु असताना दुसरीकडे दुसरीकडे परिणीती चोप्राला ट्रोल केलं जात आहे. परिणीतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि स्वतःचा सेल्फी शेअर करत म्हणाली नवा चित्रपट नवी केशरचना असा कॅप्शन तिने दिला आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई

“लोकांचे हेतू…”; शाहरुख-दीपिकाच्या ‘बेशरम’ गाण्यावर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं भाष्य

परिणितीच्या फोटोवर आता नेटकऱ्यांनी लक्ष केले आहे. एकाने लिहले आहे, “अंधभक्त आता येतीलच” दुसऱ्याने लिहले आहे, “ते आता पुढच्या दिवाळीत येतील,” तर आणखीन एकाने लिहले आहे, “परिणिती चोप्रावर बहिष्कार टाका तिच्या बुटांची लेसदेखील भगव्या रंगाची आहे.” अशा शब्दात त्यांनी ट्रोल केलं आहे. मात्र काहीजणांनी तिला शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

परिणीती नुकतीच ‘उंचाई’ या चित्रपटात दिसली होती. परिणितीने आपल्या करियरची सुरवात यशराज फिल्म्समध्ये जनसंपर्क विभागातून केली आहे. ‘लेडीज वर्सेस बेहल’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. त्यानंतर ‘इशकजादे’, ‘हसी तो फसी’, ‘केसरी’, ‘शुध देशी रोमान्स’ यांसारख्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून तिने काम केले आहे. ‘गोलमाल ४’ चित्रपटातून ती एक वेगळ्या भूमिकेतून दिसली होती.