यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास ठरली आहे. कारण २५ ऑक्टोबरला (गुरुवारी) दोन बिग बजेट हिंदी तर एक मराठी ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. आता दोन हिंदी चित्रपटांमध्ये कोणता चित्रपट सर्वाधिक कमाई करत आहे हे समोर आलं आहे. अक्षय कुमारचा ‘राम सेतू’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. आता ‘राम सेतु’ व ‘थॅंक गॉड’ चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे.

आणखी वाचा – ‘राम सेतू’, ‘थँक गॉड’ की ‘हर हर महादेव’? कोणत्या चित्रपटाला मिळणार प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद?

‘राम सेतु’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. प्रदर्शनापूर्वीच अक्षयचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे ‘राम सेतु’ला प्रेक्षकांच्या कितपत प्रतिसाद मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं. पण सध्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे.

‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर सर्वाधिक कमाई करणारा अक्षयचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटांच्या तुलनेमध्ये ‘राम सेतु’ला प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. पण अजयचा ‘थँक गॉड’ मात्र फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ८ कोटी १० लाख रुपये कमाई केली.

आणखी वाचा – “मेरे आंखों में मत झांको…” नम्रता संभेरावची ‘लॉली’ पाहून सासूबाईंची भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाल्या…

‘राम सेतू’च्या तुलनेमध्ये ‘थँक गॉड’ची कमाई फार कमी आहे. अक्षच्या चित्रपटामुळे ‘थँक गॉड’च्या कमाईवर परिणाम झाला असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचा बजेट जवळपास ७० कोटी रुपये आहे. पण पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट कितपत कमाई करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.