अभिनेत्री अनन्या पांडेचे चुलत बहीण अलाना पांडे गेल्या वर्षी इवॉर मॅकबरोबर लग्नबंधनात अडकली होती. आता लग्नाच्या एक वर्षानंतर अलाना आई होणार आहे. त्यामुळे लवकरच अनन्या मावशी होणार असून तिने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

अनन्या पांडेने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर बहीण अलाना आई होणार असल्याची माहिती दिली. अलाना व तिच्या पतीचा सुंदर व्हिडीओ शेअर करत अनन्या म्हणाली की, “मी आता मावशी होणार आहे. बेबी, मी तुझ्यावर प्रेम करते.”

हेही वाचा – “आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श उदाहरण…”, सलील कुलकर्णींनी केलेल्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक

अनन्याची बहीण अलाना गर्भवती असल्यामुळे खूप आनंदात आहे. अलीकडेच तिने मॅटर्निटी फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटमध्ये अलाना पतीबरोबर जंगलात पोज देताना दिसली. याच फोटोशूटचा व्हिडीओ करून अनन्याच्या बहिणीने ही आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा – नऊ महिने डेटिंग, दिल्लीत थाटामाटात लग्न अन् आता दोन वर्षांनी प्रसिद्ध अभिनेता घेणार घटस्फोट, म्हणाला…

दरम्यान, अलाना ही चंकी पांडेचे भाऊ चिक्की पांडे व फिटनेस इंस्ट्रक्टर डीन पांडे यांची मुलगी आहे. अनन्याची ही चुलत बहीण पेशाने मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तर अनन्याचा जीजू इवॉर फोटोग्राफर आणि व्हिडीओग्राफर आहे. अलाना व इवॉर लग्नाआधी एकमेकांना दोन वर्ष डेट करत होते. त्यानंतर मालदीवमध्ये इवॉरने अलानाला प्रपोज केलं. मग दोघं २०२१मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकले.