Premium

“मी रणबीरच्या पाया पडून…” ‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केले अभिनेत्याच्या कामाचे कौतुक

नुकताच हैदराबाद येथे या चित्रपटाचा एक प्री-रिलीज इव्हेंट पार पडला ज्याला एसएस. राजामौली, महेश बाबूसारख्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली

sandeep-reddy-vanga-animal-ranbir
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले बरेच दिवस रणबीरचे चाहते आणि चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची दोन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने ७ कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. नुकतंच आपल्या ट्वीटमध्ये याचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट मिळाल्याचं जाहीर केलं अन् या चित्रपटाची लांबीही ३ तास २१ मिनिटे असल्याचं स्पष्ट केलं.

आणखी वाचा : ‘IFFI’मध्ये ‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला मिळाला विशेष ज्यूरी पुरस्कार; कन्नड चित्रपटाला प्रथमच मिळाला ‘हा’ सन्मान

नुकताच हैदराबाद येथे या चित्रपटाचा एक प्री-रिलीज इव्हेंट पार पडला ज्याला एसएस. राजामौली, महेश बाबूसारख्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. याच कार्यक्रमात महेश बाबूने रणबीर कपूरचं कौतुक केलं, यापाठोपाठ दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनीही हटके स्टाइलमध्ये रणबीरच्या कामाची प्रशंसा केली. कार्यक्रमात संदीप म्हणाले, “रणबीर हा माझ्यापेक्षा कदाचित लहान असेल, पण जेव्हा मी त्याला ‘अ‍ॅनिमल’मध्ये परफॉर्म करताना पाहिले आहे, तेव्हा मी त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेत असल्याचीच भावना माझ्या मनात यायची. इतका संयमी अभिनेता मी आजवर पाहिलेला नाही.”

‘अ‍ॅनिमल’ची सध्या जोरदार चर्चा आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त तिकीटविक्री केली आहे. चित्रपटप्रेमी व रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल व रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ डिसेंबरला विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’सह ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Animal director sandeep reddy vanga praises actors work and his patience avn

First published on: 29-11-2023 at 10:38 IST
Next Story
राणी मुखर्जीच्या आई-वडिलांना यश चोप्रांनी खोलीत केलेलं बंद, अभिनेत्रीसमोर ठेवली होती फक्त एकच अट