बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात. सध्या अनुराग त्याच्या आगामी ‘केनडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. अनुराग बऱ्याचदा वेगवेगळ्या वादांमुळेही चर्चेत असतो.

नुकतंच कलकत्ता येथील एका कार्यक्रमामध्ये अनुराग कश्यपने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि एकूणच त्यामुळे देशातले बदलेले वातावरण याबद्दल भाष्य केलं आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला देशातील मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. त्याबद्दलच अनुरागला विचारणा झाल्यावर त्याने यावर सडेतोड भाष्य केलं.

Ayodhya Ram Mandir Tourism
विश्लेषण: अयोध्येचे राम मंदिर ठरले ‘गेम चेंजर’, भाविकांमध्ये ५०० पटींनी वाढ; का वाजतोय धार्मिक पर्यटनाचा देशभरात डंका?
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी

आणखी वाचा : ‘मै हूं ना’मधील ‘या’ भूमिकेसाठी कमल हासन यांना विचारण्यात आलं होतं; फराह खान म्हणाली, “शाहरुखच्या आग्रहास्तव…”

अनुराग म्हणाला, “२२ जानेवारीला जे काही घडलं ती एक मोठी जाहिरात होती. मलातरी किमान ते तसंच वाटलं. बातम्या सुरू असताना ज्या जाहिराती असतात अगदी तशीच ही जाहिरात होती, फक्त ही २४ तास चालणारी जाहिरात होती. मी नास्तिक आहे यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझा वाराणसीमध्ये जन्म झाला आहे अन् धर्माच्या नावाने केला जाणारा व्यवसाय हा मी फार जवळून पाहिला आहे. धर्म हा निंदकाचा शेवटचा उपाय आहे. जेव्हा तुमच्याकडे काहीच उरत नाही तेव्हा तुम्ही धर्माकडे वळता.”

पुढे अनुराग म्हणाला, “मी स्वतःला नास्तिक मानतो कारण लहानपणापासून मी बऱ्याच हतबल लोकांना मंदिरात जाऊन देवासमोर हात पसरताना पाहिलं आहे, जसं की देवाकडे एक रामबाण उपाय आहे ज्यामुळे त्यांच्या सर्व समस्या दूर होणार आहेत. हा सगळा प्रकार थांबवण्यासाठी कुणीही मोहीम का काढली नाही?” आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर आपले मोबाइल फोन्स आणि टॅबलेट आपण फेकून द्यायला पाहिजेत असंही अनुराग म्हणाला. तो म्हणतो, “जर आपल्याला एक क्रांति घडवून आणायची आहे तर मग आपण सगळ्यांनी आपले मोबाइल फोन्स आणि टॅबलेट नष्ट करायला हवेत, जसं स्वदेशी चळवळीदरम्यान आपण परदेशी कापडाची होळी केली होती. आज आपल्याला स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा नाहीये तर लोकशाहीचा मुखवटा धारण केलेल्या फॅसिझमविरुद्ध आपल्याला लढायचं आहे.”