बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रभावशाली चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. आपल्या हटके शैलीसाठी आणि नव्या प्रतिभावान कलाकारांना काम देण्यासाठी तो ओळखला जातो. त्याच्या चित्रपटात बॉलीवूडमधील आघाडीचे कलाकार नसले तरी चित्रपट हिट होतात.

नुकतंच अनुरागने बॉलिवूडविषयी भाष्य केलं आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या ‘जमीनदारी’ वृत्ती पाहायला मिळत असल्याचं अनुरागने स्पष्ट केलं आहे. याबरोबरच चित्रपटसृष्टीतील इतरही काही समस्यांबद्दल अनुरागने उघडपणे भाष्य केलं.

Marathi Films Clash, Maharashtra Day, Nach Ga Ghuma, Swargandharva Sudhir Phadke, Theatres, IPL and Lok Sabha Election, marathi films, maharashtra din, 2 marathi movies clash, maharashtra din 2024, maharashtra day, entertaintment news, new marathi film,
‘महाराष्ट्र दिना’ च्या मुहूर्तावर दोन मराठी चित्रपट आमनेसामने
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘या’ सुपरहीट चित्रपटातून सचिन तेंडुलकर करणार होता बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण…

‘इ-टाइम्स’शी संवाद साधताना अनुराग म्हणाला, “पितृसत्ताक म्हणण्यापेक्षा या वृत्तीला जमीनदारी वृत्ती म्हणणं जास्त योग्य होईल. सध्या चित्रपटसृष्टीत ही वृत्ती पाहायला मिळत आहे. कित्येक दिग्दर्शक स्वतःच्या फायद्यासाठी समोरच्या व्यक्तीवर वर्चस्व गाजवू पाहत आहेत. कित्येक जण मला आजही नवीन लोकांबरोबर काम करताना प्रॉफिट शेअरिंग आणि कॉंट्रॅक्ट करून काम करायचा सल्ला देतात पण ती माझी पद्धत नाही, मला कुणालाही माझं गुलाम म्हणून वागणूक द्यायला आवडणार नाही.”

एवढंच नव्हे तर कित्येक कलाकार अनुरागबरोबर पुन्हा काम करण्यास उत्सुक असतात हेदेखील त्याने स्पष्ट केलं. नुकताच अनुराग कश्यप ‘हड्डी’ या चित्रपटात झळकला. याबरोबर अनुराग सध्या ‘बेबाक’ नावाच्या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन करतोय. शिवाय कान्स चित्रपट महोत्सवात अनुरागच्या ‘केनडी’ या चित्रपटाचं खूप कौतुक झालं, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.