scorecardresearch

“माझ्यासाठी ती अशी स्त्री…” मलायका अरोराबद्दल पहिल्यांदाच बोलली अरबाज खानची गर्लफ्रेंड

जॉर्जिया एंड्रियानी आण अरबाज खान मागच्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१८ मध्ये या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली होती

“माझ्यासाठी ती अशी स्त्री…” मलायका अरोराबद्दल पहिल्यांदाच बोलली अरबाज खानची गर्लफ्रेंड
जॉर्जियाने अरबाजबरोबरचं तिचं नातं आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी अरबाज खानबरोबर असलेल्या तिच्या नात्याबद्दल नेहमीच मौन बाळगताना दिसते. आपल्या खासगी आयुष्याबाबत प्रसार माध्यमांशी फारसं बोलणं तिला आवडत नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्जिया एंड्रियानीने अरबाज खानशी तिचं नातं आणि त्याच्या कुटुंबियांशी असलेलं बॉन्डिंग यावर भाष्य केलं. याशिवाय अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराशी तिचं नातं नेमकं कसं आहे हेही तिने या मुलाखतीत सांगितलं.

जॉर्जिया एंड्रियानी आण अरबाज खान मागच्या ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. २०१८ मध्ये या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली होती. दोघंही अनेकदा डिनर आणि लंच डेटला एकत्र जाताना दिसतात. मलायका अरोराला घटस्फोट दिल्यानंतर अरबाजने जॉर्जियाला डेट करायला सुरुवात केली. मलायका आणि अरबाजचं लग्न १९९८ मध्ये झालं होतं आणि २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. नुकतंच ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जियाने अरबाजबरोबरचं तिचं नातं आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- घटस्फोटाच्या ५ वर्षांनंतर मलायका- अरबाजमध्ये पुन्हा जवळीक? फोटोवर कमेंट करत अभिनेत्री म्हणाली…

या मुलाखतीत जॉर्जियाला “तू मलायका अरोराला भेटली आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, “मी अनेकदा तिला भेटले आहे. मला ती खूप आवडते. तिचा आतापर्यंतचा प्रवास खूपच कौतुकास्पद आहे. तिने तिच्या करिअरची सुरुवात शून्यापासून केली होती. ती एक मॉडेल होती आणि हळूहळू ती तिला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचली. आज ती त्या ठिकाणी आहे जिथे असण्याची तिची सुरुवातीपासूनच इच्छा होती. त्यासाठी मी तिला सॅल्यूट करते. माझ्यासाठी ती अशी स्त्री आहे जिचं मी खरंच कौतुक करू शकते.”

आणखी वाचा- “सकाळी शोकसभा आणि रात्री बॉयफ्रेंडबरोबर…” मलायका अरोराला नेटकऱ्यांनी सुनावलं

दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाज खानने गर्लफ्रेंड जॉर्जियाबद्दल भाष्य केलं होतं. अरबाज आणि त्याच्या गर्लफ्रेंजडच्या वयात २२ वर्षांचं अंतर आहे. यावर अरबाज म्हणाला, “आमच्या वयात बराच मोठा फरक आहे. पण आम्हाला हे कधीच जाणावलं नाही. कधी कधी मी तिला विचारतो ‘खरंच?’ हे एक छोटं अफेअर असू शकलं असतं. पण जेव्हा तुम्ही एका नात्यात असता तेव्हा तुम्ही खूप पुढचा भविष्यातला विचार करत नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 11:39 IST

संबंधित बातम्या