नेटफ्लिक्सवर ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘भक्षक’ चित्रपटाच्या यशानंतर भूमी पेडणेकरचं बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कौतूक होत आहे. या चित्रपटात भूमीने पत्रकाराची भूमिका साकारली होती. आदित्य श्रीवास्तव, संजय मिश्रा, विभा छब्बर यांच्यासह मराठमोळी सई ताम्हणकर यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत भूमीने हॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा दर्शवली. भूमी म्हणाली, “मला हॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा आहे. संस्कृती आणि विविधता असणाऱ्या या जगात कलाकारांसाठी महत्त्वाकांक्षी असण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. ज्याप्रकारे आजकाल चित्रपट आणि सीरिज बनविले जातात. तसेच विविध भूमिका लिहिल्या जातात त्याप्रकारे कलाकार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम करिअर करू शकतात, असं मला वाटतं.”

हेही वाचा… समांथा रुथ प्रभूचा मलेशियामधील बिकिनी लूक व्हायरल; चाहते म्हणाले, “नागा चैतन्य…”

भूमी पुढे म्हणाली की, “भारतीय कलाकार आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक चित्रपट आणि सीरिज करत आहेत. उदाहरणार्थ, नेटफ्लिक्सच्या ‘वन डे’ या सीरिजमधील अंबिका मॉड. ज्या सीरिजला जगभरात खूप प्रेम मिळाले अशा यशस्वी सीरिजमध्ये एका भारतीय मुलीला मुख्य भूमिकेत पाहणे खूप समाधानकारक आहे.”

आजकाल जर एखादं पात्र विशिष्ट प्रदेशातील असेल तर त्या पात्रासाठी निर्माते भारत किंवा इतर देशातील कलाकार निवडतात. जर भूमीला आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समधून समाधान आणि आनंद मिळत असेल तर ती नक्कीच असे प्रोजेक्ट्स निवडेल, असं भूमी म्हणाली.

हेही वाचा… डेटवर गेल्यावर बिलाचे पैसे भरणाऱ्या फेमिनिस्ट स्त्रियांना जया बच्चन यांनी लगावला टोला; म्हणाल्या, “त्या किती मूर्ख…”

दरम्यान, भूमीचा ‘भक्षक’ चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून याचे दिग्दर्शन पुलकितने केले आहे. हा चित्रपट २०१८च्या मुझफ्फरपूर शेल्टर होम केसवर आधारित आहे . भूमीच्या आगामी चित्रपटाबाबत सांगायचं झाल्यास, ‘मेरे हजबन्ड की बीवी’ चित्रपटात भूमी,अर्जून कपूर आणि रकुल प्रीत सिंग प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २०२४ रोजी प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhumi pednekar on hollywood aspirations bhumi will choose an international project on the basis of creativity and joy dvr
Show comments