जया बच्चन या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात. वेगवेगळ्या विषयांवर त्या आपले मत निर्भीडपणे मांडत असतात. जया बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या नातीच्या वॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती. नव्या नवेली नंदाचा वॉडकास्ट ‘व्हॉट द हेल नव्या २’ नुकताच प्रदर्शित झाला. त्यात जया बच्चन, श्वेता बच्चन व नव्या यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्याची आई श्वेता बच्चन, भाऊ अगस्त्य व आजी जया बच्चन यांच्याशी गप्पा मारताना, नव्याने पुरुष आणि टॉक्सिसिटी या विषयावर चर्चा केली. डेटवर जाताना स्त्रियांना जेवणाचे पैसे द्यावेसे वाटतात. कारण- आजच्या काळात स्त्रिया कोणावरही अवलंबून राहत नाहीत. या विषयावर आपले मत मांडताना जया बच्चन म्हणाल्या, “अशा स्त्रिया मूर्ख असतात.”

हेही वाचा… ट्विंकल खन्नाच्या ‘त्या’ विधानावर कंगना रणौतचे खडेबोल; म्हणाली, “पुरुषांना प्लास्टिकची बॅग…”

फेमिनिजम आल्यानंतर आणि स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्यानंतर त्यांना कशा प्रकारे स्वतंत्र आयुष्य जगायचे असते याबाबत नव्या सांगत होती. ती म्हणाली, “उदाहरणार्थ- जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला डेटवर घेऊन जाता आणि त्या डेटचा खर्च तुम्ही करता तेव्हा ती स्त्री नाराज होते. कारण- स्त्रियांना असं वाटतं की, त्यांना समानतेनं…” नव्याचे बोलणे संपण्याअगोदरच जया बच्चन मधे बोलल्या, “त्या स्त्रिया किती मूर्ख असतात. अशा वेळी तुम्ही पुरुषांना पैसे देऊ द्यावेत.”

परंतु, या सगळ्याकडे पाहण्याचा अगस्त्यचा दृष्टिकोन वेगळा होता. तो म्हणाला, “जोपर्यंत पुरुष नम्रपणे स्त्रीसाठी काही करू इच्छितो, तोवर त्यांना काहीच समस्या नसते. परंतु, जर या सगळ्यात तो त्याचा पुरुषार्थ मध्ये आणत असेल, तर स्त्रियांना त्याचा नक्कीच त्रास होऊ शकतो.”

हेही वाचा… ‘दंगल’ फेम सुहानीच्या निधनानंतर आमिर खाननं घेतली तिच्या कुटुंबाची भेट; श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेता पोहोचला फरीदाबादला

अगस्त्य पुढे स्पष्टीकरण देत म्हणाला, “जर पुरुष नम्रपणे म्हणाला की, मला या जेवणाचे पैसे द्यायला जरूर आवडेल, तर ते चुकीचं वाटणार नाही. परंतु, तो पुरुष जर असं म्हणत असेल की, मी कमावता आहे, तर मीच जेवणाचे पैसे देईन. मग अशा वागणुकीमुळे स्त्रियांचे मन नक्कीच दुखावले जाऊ शकते.”

हेही वाचा… सलमान खानच्या पँटवर त्याचाच चेहरा; अभिनेत्याचा एअरपोर्ट लूक पाहून चाहते म्हणाले…

दरम्यान, जया बच्चन ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात शेवटच्या झळकल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. करण जोहर निर्मित या चित्रपटात आलिया भट्ट, रणवीर सिंह, धर्मेंद्र व शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaya bachchan says women are stupid for stopping men from paying on dates in the navya 2 show dvr
First published on: 24-02-2024 at 11:22 IST