बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता म्हणून वरुण धवनला ओळखले जाते. अभिनयाबरोबरच वरुण त्याच्या खोडकर स्वभावामुळे नेहमी चर्चेत असतो. वरुणने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. वरुणच्या नव्या पोस्टन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वरुण लवकरच बाबा होणार आहे. वरुणची पत्नी नताशा गरोदर असून लवकर त्यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. वरुणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. वरुणने नताशा व त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये नताशा गरोदर असल्याचे दिसून येत आहे. तर वरुण तिच्या बेबी बंपचे चुंबन घेत आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले आम्ही प्रेग्नंट आहोत, आम्हाला तुमच्या प्रेमाची व आर्शिर्वादाची गरज आहे.” वरुणची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत दोघांचे अभिनंदन केले आहे.

Dr Dharmesh Patel California accident
स्वतःच्या कुटुंबालाच मृत्यूच्या दरीत ढकल्यानंतर भारतीय व्यक्तीला अटक, सुनावणी सुरू असताना समोर आली धक्कादायक माहिती
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

२४ जानेवारी २०२१ ला वरुण व नताशाने लग्नगाठ बांधली. केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला अलिबागच्या द मॅन्शन रिसॉर्टमध्ये या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. वरुण व नताशा लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण आहेत. लग्नाअगोदर दोघेबऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. वरुणने त्याच्या करिअरच्या सुरूवातीला नताशा आणि त्याच्या रिलेशनशिपबद्दल जगजाहीर केले नव्हते. मात्र दोघांना बऱ्याचवेळा एकत्र पाहिले गेले होते. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर दोघे आई-बाबा होणार आहेत.

हेही वाचा- Video: WWE स्टार जॉन सीनाला पडली शाहरुख खानची भूरळ; अभिनेत्याचे ‘हे’ प्रसिद्ध गाणं गातानाचा व्हिडीओ व्हायरल

वरुण धवनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्यावर्षी त्याचा बवाल चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये त्याच्याबरोबर जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका होती. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता लवकरच वरुणचा ‘बेबी जॉन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो ‘सिटाडेल’ चित्रपटातही झळकणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर साऊथची अभिनेत्री सामंथा प्रभुची मुख्य भूमिका आहे. तसेच तो ‘स्त्री 2’ मध्येही दिसणार असल्याचे सांगण्यात येते. हा चित्रपट ३० ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.