scorecardresearch

Premium

काजोलचा राजेशाही थाट! मुंबईत ऑफिससाठी खरेदी केली नवीन जागा, किंमत वाचून व्हाल थक्क

काजोलने मुंबईमध्ये तिच्या ऑफिससाठी जागा घेतली आहे.

kajol

बॉलीवूड कलाकार हे त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या लाइफस्टाईलमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. त्यांचे ब्रँडेड कपडे, महागड्या गाड्या, आलिशान घरं यांची नेहमीच चर्चा रंगते. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे काजोल. अजय देवगण आणि काजोल वरचेवर प्रॉपर्टी खरेदी करत असतात. तर आता काजोलने मुंबईमध्ये तिच्या ऑफिससाठी जागा घेतली आहे.

आणखी वाचा : Video: “आईला मान खाली घालायला लावली…” चारचौघात काजोलबरोबर केलेल्या ‘त्या’ वागणूकीमुळे न्यासा देवगणवर नेटकरी नाराज

BMC Bharti 2024 vacant posts of Junior Lawyers There are total of various vacancies are available
BMC Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरू; ‘येथे’ पाठवा अर्ज
ration distribution mediator beaten Kalyan
कल्याणमध्ये शिधावाटप मध्यस्थाला लोखंडी सळईने मारहाण
mumbai municipal corporation marathi news, mumbai concretization work marathi news
पाच टक्के रस्त्यांचेच काँक्रीटीकरण, मुंबईतील उर्वरित ९५ टक्के काम कधीपर्यंत पूर्ण करणार? उच्च न्यायालयाची महापालिकेला विचारणा
Street Food Zone Pune Municipal corporation street vendors committee marathi news
पुण्यात खाऊ गल्लीसाठी महापालिकेचे नवे धोरण

काजोल ही कोट्यावधींची मालकीण आहे. अनेक ठिकाणी तिची घरं आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने बारा कोटींची दोन घरं खरेदी केली होती. तर तिचा नवरा अजय देवगणनेही नुकतीच एक काही कोटी किंमत असलेली प्रॉपर्टी खरेदी केली. त्यापाठोपाठ आता काजोलने मुंबईमध्ये तिच्या नवीन ऑफिससाठी नवीन जागा खरेदी होती आहे. त्याची किंमत आता समोर आली आहे.

हेही वाचा : “…तर आज ही वेळ आली नसती,” रात्री केलेल्या एका कृतीमुळे काजोल झाली ट्रोल

रिपोर्ट्सनुसार, काजोलने ओशिवराच्या ‘सिग्नेचर’ बिल्डिंगमध्ये तिच्या नवीन ऑफिससाठी जागा घेतली आहे. याची किंमत ७.६० कोटी आहे. काजोलचं ऑफिस असलेली ही बिल्डिंग ‘Lotus Grandeur’च्या अगदी बाजूला आहे. ‘Lotus Grandeur’मध्ये साजिद नाडियादवाला यांच्या रिलायन्स एंटरटेनमेंट, अंबुदतिया एंटरटेनमेंट आणि बनजय एशियासह सर्व टॉप प्रॉडक्शन कंपन्या आहेत. तर आता काजोलने ऑफिससाठी घेतलेल्या या जागेची किंमत समोर आल्यावर अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actress kajol buys new property in mumbai for her new office know the price rnv

First published on: 29-08-2023 at 13:08 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×