Deepika Padukone Ranveer Singh Announce Pregnancy : अभिनेत्री दीपिका पदुकोण व रणवीर सिंह बॉलीवूडमधील लोकप्रिय कपल आहे. ऑनस्क्रीनबरोबरच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळे दोघे नेहमीच चर्चेत असतात. आदर्श जोडी म्हणून दोघांकडे बघितले जाते. दीपिका व रणवीर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. आता दीपिकाने तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

दीपिका व रणवीर लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘सप्टेंबर २०२४’ असे लिहिले आहे व खाली तिचे व रणवीरचे नाव लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये लहान बाळाचे कपडे व खेळण्यांचे चित्रही रेखाटले आहे. दीपिकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या गुडन्यूजनंतर चाहत्यांबरोबरच बॉलीवूडमधील अनेक मंडळी तिचे अभिनंदन करताना दिसत आहेत.

Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
girl rescued within twelve hours
अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची बारा तासांत सुटका

रणवीर व दीपिकाची लव्हस्टोरी

‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटापासून रणवीर व दीपिकाची लव्हस्टोरी सुरू झाली. या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघे ‘बाजीराव-मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ या चित्रपटात एकत्र झळकले. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रणवीर व दीपिकाने १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये दोघांच्या शाही लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २०१५ मध्ये रणवीर आणि दीपिकाने गुपूचप साखरपुडाही केला होता. एका मुलाखतीत रणवीरने याबाबत खुलासाही केला होता.

हेही वाचा- तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”

दीपिका रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २०२३ वर्ष दीपिका व रणवीरसाठी खूप खास ठरले. गेल्या वर्षी दीपिकाचे प्रदर्शित झालेले ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती, तर रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटही हिट ठरला होता. २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘फायटर’ चित्रपटात दीपिका झळकली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर ऋतिक रोशनची मुख्य़ भूमिका आहे. तसेच तिचा ‘कल्कि २८९८ एडी’ व रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.