scorecardresearch

Video : दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही इमरान हाश्मीला किस करत राहिली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, तब्बल पाच वेळा…

त्या गाण्याचा मेकिंग व्हिडीओही समोर आला होता.

emraan hashmi kissing scene
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या वेळी 'हा' किस्सा घडला होता.

बॉलिवूडचा सीरियल किसर अशी ओळख असणाऱ्या अभिनेता इमरान हाश्मीचा आज वाढदिवस. इमरान आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटात विविध अभिनेत्रींबरोबर रोमँटिक सीन्सचे चित्रीकरण केले आहे. पण एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एक अभिनेत्री इतकी मग्न झाली होती की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तिने इमरानला किस करणं थांबवलं नव्हतं. तिने स्वत:च याबद्दल खुलासा केला होता.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजहर’ या चित्रपटाच्यावेळी हा किस्सा घडला होता. या चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर अभिनेत्री नरगिस फाखरीने स्क्रीन शेअर केली होती. ती या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील ‘बोल दो ना जरा’ हे गाणे हिट ठरले होते. त्या गाण्याचा मेकिंग व्हिडीओही काही महिन्यांनी समोर आला होता. त्यात त्यांनी याबद्दल खुलासा केला होता.
आणखी वाचा : “तुम्ही माझ्यासाठी गायलेली गाणी…”; केके यांच्या आठवणीत इमरान हाश्मी झाला भावूक

या व्हिडीओत त्यांचे काही सहकलाकार हे त्यांना सीन समजवताना दिसत आहे. इमरान आणि नरगिस हे एक किसिंग सीन शूट करताना दिसत आहे. जवळपास पाच वेळा किसिंगच्या दृश्याचे शूटींग करण्यात येत आहे. यादरम्यान दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही नरगिस इमरानला किस करताना या व्हिडीओत दिसत आहे. ते पाहून सर्वांना धक्का बसतो. पण ते सर्वजण या गोष्टी मजेशीर अंदाजात घेतात.

या व्हिडीओमध्ये नरगिस म्हणते की, ‘मला एक सीनदरम्यान इमरानला पाच वेळा किस करावे लागले होते. त्यासाठी मी जास्त पैशांची मागणी करणार होते. कारण हे माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हते. किसिंग सीन देताना इमरान अरे देवा मला हे खरच माहिती नाहीये, अशाप्रकारे अभिनय करत होता. पण तसं अजिबात नव्हतं. तो या सगळ्यात आनंदी होता.

आणखी वाचा : “माझ्या आयुष्यात…” ओंकार राऊतबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर प्रियदर्शनी इंदलकरची प्रतिक्रिया

‘अजहर’ हा चित्रपट माझी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात इमरानने मोहम्मद अजहरुद्दीन यांची भूमिका साकारली होती. तर नरगिसने संगीता बिजलानी यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसूजा आणि अँथनी डिसूजा यांनी केले होते. या चित्रपटात प्राची देसाई देखील दिसली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 08:24 IST

संबंधित बातम्या