शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला १९ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. ओटीटी अॅपच्या माध्यमातून पॉर्नोग्राफी सामग्री वितरित केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याच प्रकरणात त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये राज कुंद्राने पहिल्यांदा यावार भाष्य केलं. लवकरच सत्य बाहेर येईल, असे त्याने आपल्या सोशल मीडियावर म्हटले. आता कदाचित तो त्याची बाजू समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता राज कुंद्रावर चित्रपट येणार अशी चर्चा रंगली आहे. हा चित्रपट त्याचा बायोपिक नसून तुरुंगात राजने घालवलेल्या दिवसांवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे असं म्हंटलं जात आहे. शिवाय या चित्रपटाच्या माध्यमातून राज कुंद्राची बाजू जनतेसमोर येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. 'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट राज कुंद्राच्या वादग्रस्त प्रकरणावर भाष्य करणारा असेल. आणखी वाचा : "बरेच फिल्ममेकर्स त्यांच्या…" बॉलिवूडच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचं मोठं विधान वादात सापडल्यानंतर त्याचे काय झाले हे या चित्रपटात दाखवले जाईल. या चित्रपटात राज कुंद्राचे आर्थर रोड जेलमधील अनुभव दाखवले जाणार आहेत. अद्याप चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नावही समोर आलेले नाही. पण राज कुंद्रा चित्रपटाच्या निर्मितीपासून ते स्क्रिप्टपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असणार आहे असं स्पष्ट झालं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असेल याबद्दलही चर्चा सुरू आहे. या चित्रपटात राज कुंद्रा स्वत: अभिनय करणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अद्याप या चित्रपटावर काम सुरू आहे शिवाय याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकरच याचे चित्रीकरण सुरू होईल असं सांगितलं जात आहे. २१ सप्टेंबर २०२२ रोजी राज कुंद्राने केलेलं ट्वीट त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं. त्या ट्वीटमध्ये राज म्हणाला, "आज मला आर्थर रोड जेलमधून बाहेर पडून एक वर्ष पूर्ण झाले. लवकरच न्याय मिळेल. सत्य लवकरच बाहेर येईल. शुभचिंतकांचे आभार आणि त्याहूनही अधिक ट्रोल करणाऱ्यांचे आभार. तुम्हीच माझी हिंमत वाढवली आहे." त्यामुळे आता राज यांच्या या चित्रपटाबद्दल लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.