अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा धमाकेदार प्री -वेडिंग सोहळा जामनगरमध्ये पार पडला. १ ते ३ मार्चपर्यंत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला जगभरातील अनेक नामवंत व प्रतिष्ठित लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बॉलीवूड सेलिब्रिटीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी जामनगरला गेले होते. या सोहळ्यातील काही क्षण जान्हवी कपूरने शेअर केले आहेत.

जान्हवीने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी व त्याची पत्नी साक्षी धोनी यांच्याबरोबर फोटो शेअर केला आहे. त्याशिवाय तिच्या व मनीष मल्होत्राच्या डान्सचा एक फोटो, बाबा बोनी व बहीण खुशीबरोबरचा एक फोटो, बॉयफ्रेंड शिखर पहारियासह पाहुण्यांबरोबर पोज देतानाचा फोटो आणि शिखरचा भाऊ वीरबरोबर डान्स करताना फोटो असे प्री वेडिंगमधील काही खास फोटो शेअर केले आहेत.

सलमान खानला उचलू शकला नाही अनंत अंबानी, शेराला हाक मारली अन्…, प्री वेडिंगमधील ‘तो’ Video Viral

जान्हवीने अनंत व राधिका यांचाही एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या सर्व फोटोंमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. तिने दोन दिवस गुलाबी रंगाचे पारंपरिक कपडे निवडले होते, तर एक दिवस तिने जांभळी साडी नेसली होती. जान्हवीने शेअर केलेले फोटो व्हायरल होत आहेत.

Video: अभिषेक बच्चनने ऐश्वर्या व लेकीसह केलं एंजॉय; आराध्याचा नवा लूक पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, अनंत अंबानी व राधिका मर्चंट जुलै महिन्यात लग्न करणार आहेत. त्यापूर्वी गुजरातमधील जामनगर इथं त्यांचा प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात बॉलीवूड सेलिब्रिटींचे स्पेशल परफॉर्मन्स झाले. आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानादेखील या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच भारतात आली होती. जान्हवीने ‘झिंगाट’ गाण्यावर रिहानाबरोबर डान्स केला होता.