बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून न्यायालयाकडून अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने आज(२८ एप्रिल) या प्रकरणातील अंतिम निकाल दिला. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अभिनेता आदित्य पांचोलीची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याची आई व अभिनेत्री जरीना वाहिब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सत्यमेव जयते…देव महान आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर माझा सुरुवातीपासूनच विश्वास होता. माझ्या मुलासाठी ही १० वर्ष खूप वेदनादायी होती. यामुळे सूरजच्या हातातून अनेक प्रोजेक्ट गेले आहेत. आता तो सामान्य जीवन जगू शकतो. पण ही १० वर्ष त्याला परत कोण आणून देणार?” असं जरीना म्हणाल्या.

nagpur, acid attack, acid attack in Nagpur, Girlfriend Throws Acid on Boyfriend's Face, Girlfriend Boyfriend Argument, Severe Injuries Reported, Nagpur crime news, crime in Nagpur, Nagpur accid attack case,
नागपुरात ॲसिड हल्ला; प्रेयसीने प्रियकराच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले
Avinash jadhav
“एका अब्जाधीश गोल्ड माफियाला…”, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अविनाश जाधवांचा मोठा दावा; म्हणाले…
What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..

हेही वाचा>> जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पोस्ट, इन्स्टा स्टोरी शेअर करत म्हणाला…

नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री जिया खानने २५ व्या वर्षी गळफास घेत आयुष्य संपवलं. ३ जून २०१३ साली जियाने तिच्या जुहूमधील राहत्या घरी आत्महत्या केली. जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिचा बॉयफ्रेंड व अभिनेता सूरज पांचोलीवर लावण्यात आला होता.

हेही वाचा>> जिया खान आत्महत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेला सूरज पांचोली कोण आहे? सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातही जोडलं गेलेलं नाव

जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी आज न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. “पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचं सिद्ध झालंय,” असं विशेष सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितलं.