Shraddha Murder Case : वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा दिल्ली येथे करण्यात आलेला खून सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने दिल्लीत राहत्या घरी श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेऊन तब्बल तीन आठवडे तो टप्प्याटप्प्यात त्याची विल्हेवाट लावत होता. या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. मात्र या घटनेनंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. यानंतर या घटनेप्रकरणी अनेक कलाकार संताप व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री कविता कौशिक ही तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. समाजातील तिला न पटणाऱ्या गोष्टींबद्दल ती नेहमी भाष्य करत असते. आता तिने ट्वीट करत आफताब अमीन पूनावालाबद्दल राग व्यक्त केला आहे. तसंच त्याला मोठ्यातली मोठी म्हणजे फाशीची शिक्षा मिळायला हवी असं ती म्हणाली. कविताने एक ट्वीट करत लिहिले, “आफताबला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. त्याने केलेल्या गुन्ह्यासाठी दुसरी कोणतीही शिक्षा योग्य असू शकत नाही.”

supreme court ramdev
पतंजलीच्या फसव्या जाहिरातींप्रकरणी रामदेव यांच्या वकीलांवर न्यायमूर्तींचा संताप; म्हणाले, “आम्ही आता हात वर केलेत”
sam pitroda controversial statement
सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?
Indian-American Congressman Shri Thanedar
“ही फक्त सुरुवात..”, अमेरिकेत हिंदूंवर हल्ले वाढल्यानंतर भारतीय वंशाच्या खासदाराने व्यक्त केली चिंता
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

आणखी वाचा : Bigg boss 16: बिग बॉसच्या घरात होणार ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची वाइल्ड कार्ड एंट्री, नाव आलं समोर

कविता कौशिकच्या या ट्वीटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत तिचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हटलं. त्याचप्रमाणे आफताबने श्रद्धाचा जितक्या निर्घृणपणे खून केला, तितकीच क्रूर शिक्षा त्यालाही देण्यात यावी, अशी प्रतिक्रियाही अनेकांनी कविताच्या ट्वीटवर दिली आहे.

हेही वाचा : Shraddha Murder Case : “भांडणात चुकून मृत्यू झाला हेच पटत नाही…” मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

दरम्यान श्रद्धाचे २०१९ पासून आफताबशी प्रेमसंबंध होते. तेव्हा ते दोघेही वसईला वास्तव्याला होते. एका डेटिंग अ‍ॅपवर त्यांची ओळख झाली होती. ते दोघे एकाच कॉल सेंटरमध्ये काम करत होते. काही महिन्यांनंतर श्रद्धाने तिच्या कुटुंबियांना अफताब आणि तिच्या नात्याबद्दल सांगितले. आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला. कुटुंबियांचा विरोध पत्करत ती आफताबसह नायगाव येथे राहायला गेले. मार्च २०२२ मध्ये ते दिल्लीला राहायला गेले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.