बॉलीवूड अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी व प्रसिद्ध दिग्दर्शिका किरण रावने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केली आहे. दरम्यान, किरण सध्या तिच्या ‘लापता लेडीज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात भोजपुरी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व भाजपा खासदार रवी किशन यांची महत्त्वाची भूमिका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकारण आणि अभिनय अशा दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी रवी किशन यांनी केली आहे. ‘लापता लेडीज’मुळे रवी किशन पुन्हा चर्चेत आले आहेत. परंतु हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना कायम कमी लेखलं गेलं आणि त्यांच्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही अशी खंत नुकतीच रवी किशन यांनी व्यक्त केली आहे. ‘नवभारत टाइम्स’शी संवाद साधतांना रवी किशन यांनी त्यांच्या करिअरबद्दल बरेच खुलासे केले अन् हिंदी चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दल भाष्य केलं.

आणखी वाचा : “असे चित्रपट अत्यंत बेकार…”, तिग्मांशु धुलिया यांची विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका

रवी किशन म्हणाले, “मी या चित्रपटातील मनोहर सारखं पात्र आजवर कधीच साकारलेलं नाही. खरं सांगायचं तर हिंदी चित्रपटात मला म्हणाव्या तशा भूमिका आणि वाव मिळालाच नाही. हिंदी चित्रपटसृष्टीने माझ्या कामाची कदर केली नाही. दिग्दर्शक किरण राव व अभिनेते आमिर खान यांचे मी आभार मानू इच्छितो की त्यांनी मला इतकी उत्तम भूमिका दिली. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये माझ्या तोंडी एक संवाद आहे की, “माझी बायको तरी अजून पळून गेलेली नाही.” हा सीन पाहून माझ्या पत्नीला चांगलाच राग आला होता, पण जेव्हा मी तिला सांगितलं की हा एका पात्राच्या तोंडचा संवाद आहे तेव्हा कुठे तिला त्यामागचा विनोद लक्षात आला.”

रवी किशन यांनी ‘तेरे नाम, ‘लक’, ‘मुक्काबाज’, ‘लखनौ सेंट्रल’ ‘मिशन रानीगंज’सारख्या बऱ्याच हिंदी चित्रपटात काम केलं आहे. त्यांच्या आगामी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘लापता लेडीज’मध्ये नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन आणि किंडलिंग प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवला गेला आहे. या चित्रपटाची पटकथा बिप्लब गोस्वामी यांच्या पुरस्कार विजेत्या कथेवर आधारित आहे. पटकथा व संवाद स्नेहा देसाई यांनी लिहिले आहेत, तर अतिरिक्त संवाद दिव्यानिधी शर्मा यांनी लिहिले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laapataa ladies actor ravi kishan says he was underestimated in hindi cinema avn