Premium

Video: लहान मुलगा बोबड्या बोलात म्हणाला ‘ऐश्वल्या लाय’, अभिनेत्रीने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चनचा ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहा…

aishwarya rai
ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चनचा 'हा' व्हायरल व्हिडीओ पाहा…

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. अनेक जण सोशल मीडियामुळे रातोरात स्टार झाल्याचं आपण पाहिलं आहे. अशा या सतत लोकांचं मनोरंजन करत असलेल्या सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची लेक आराध्या बच्चनचा हा व्हिडीओ आहे. नेमकं त्यांच्याबरोबर काय घडलंय? जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “खरंच हा देश ‘डरे हुए’ किंवा ‘डराए गये’ लोगोंका झालाय” किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले…

‘ऐश्वर्या राय सुपरस्टार’ या पेजवर ऐश्वर्या आणि तिचा लेकीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत २२ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या व्हिडीओत एक लहान मुलगा ऐश्वर्या आणि आराध्याला सुरुवातीला हाय करतो. पण त्यावर फक्त आराध्य त्याच्याकडे पाहताना दिसते. मग त्या दोघी जशा पुढे जातात, तेव्हा तो मुलगा ऐश्वर्याला बोबड्या बोलात ‘ऐश्वल्या लाय’ म्हणतो. हे ऐकून आराध्या आश्चर्यचकीत होते आणि मागे पाहते. त्यानंतर ऐश्वर्या देखील मागे वळून त्या लहान मुलाला हाय करते. असा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Video: “माझे बाबा शंकर भगवान अन् आई…” क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “आराध्याला वाटलं असेल की, मी आईचं नाव इतकं वाईट उच्चारताना कधीच ऐकलं नाही.” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “आराध्य खूप गोड रिअ‍ॅक्ट झाली.” तर तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “मुलगा नशीबवान आहे. ऐश्वर्या रायनं मागे वळून पाहिलं. इथे लोक एक झलक पाहण्यासाठी वेड आहेत.”

हेही वाचा – Video: “आलिया, परिणीतीपेक्षाही छान…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शनी इंदलकरचं गाणं ऐकून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

दरम्यान, ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी तिचा ‘पोन्नियिन सेलवन २’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता ती लवकरच ‘जॅस्मिन स्टोरी ऑफ लीज्ड वॉम्ब’ आणि ‘गुलाब जामुन’ या चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे. ‘गुलाब जामुन’ या चित्रपटात ऐश्वर्या पती अभिषेक बच्चन बरोबर झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Little kid aishwarya rai calling as aishwalya laii video goes viral on social media pps

First published on: 30-09-2023 at 15:50 IST
Next Story
“लोक धक्के देत होते, ढकलत होते”, फराह खानने लालबागचा राजाच्या दर्शनाला गेल्यावरचा अनुभव, म्हणाली, “मला फक्त…”