ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका केल्या. बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध खलनायक रणजीत यांनी एका मुलाखतीत माधुरी दीक्षितबरोबर शूटिंगची एक आठवण सांगितली आहे. ‘प्रेम प्रतिज्ञा’ चित्रपटात विनयभंगाचा एक सीन शूट करायचा होता, पण तो सीन करण्याआधी माधुरी खूप रडली होती, असं ते म्हणाले.

‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत रणजीत म्हणाले, “ती (माधुरी दीक्षित) रडू लागली आणि सीन करण्यास नकार दिला. मला परिस्थितीची कल्पना नव्हती. मला काही कला दिग्दर्शकांनी याबद्दल सांगितलं होतं. त्यातला एक बंगाली होता. आमचे दिग्दर्शक बापू होते आणि ते दक्षिण भारतीय होते. मी सेटवर मजा करायचो ‘डार्लिंग थोडं तिकडे बघ, मी कपडे बदलतो,’ असं सह-कलाकारांना म्हणायचो. मला तर मेकअप रुममध्ये जायचीही सवय नव्हती. मी तसाच होतो आणि मला तसंच स्वीकारलं गेलं.”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार

विनयभंगाचा सीन हातगाडीवर होणार होता आणि ते माधुरीची वाट पाहत होते, असं त्यांनी सांगितलं. “तिचं रडणं चालूच होतं, मला दुसऱ्या शूटला जायचं होतं आणि मी त्यांना माधुरीला बोलवायला सांगितलं. पण माधुरी या सीनसाठी तयार नसल्याचं मला कुणीच सांगितलं नाही. शेवटी तिने होकार दिला. वीरू देवगण फाइट मास्टर होते. ते म्हणाले ‘आम्ही कॅमेरा फिरवत राहू, सीन मध्येच कट व्हायला नको.’ विनयभंग हा आमच्या कामाचा भाग आहे. खलनायक खऱ्या आयुष्यात वाईट नसतो,” असं रणजीत म्हणाले.

प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न

चित्रपटातील असे जबरदस्तीचे, विनयभंगाचे सीन खूप काळजीपूर्वक शूट केले जायचे. बऱ्याचदा अशा सीनमध्ये मी दुरुस्त्या सुचवायचो आणि दिग्दर्शक ते मान्य करायचे, असंही रणजीत यांनी या मुलाखतीत सांगितलं.

Story img Loader