scorecardresearch

Premium

Video : ‘कोई शहरी बाबू’ गाण्यावर अभिनेत्री मुमताज व आशा भोसलेंनी केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

७६ वर्षांच्या मुमताज व ९० वर्षांच्या आशा भोसलेंचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल

mumtaj and aasha bhosle
अभिनेत्री मुमताज आणि आशा भोसले यांचा जबरदस्त डान्स

मुमताज बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. ७० च्या दशकात मुमताज यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या सौंदर्याने मुमताज यांनी अनेकांना भुरळ पाडली होती. अभिनयाबरोबरच मुमताज नृत्यकौशल्यातही पारंगत होत्या. दरम्यान, मुमताज व ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये दोघी ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत.

हेही वाचा- “आमची रोज भांडणं होतात”, ऐश्वर्या रायने केलेला खुलासा; अभिषेक बच्चन म्हणालेला, “आयुष्य खूप…”

job opportunity in indian navy
नोकरीची संधी : इंडियन नेव्हीमधील भरती
Hockey India CEO Elena Norman resigns after nearly 13-year stint
Elena Norman : एलेना नॉर्मन यांचा हॉकी इंडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा, १३ वर्षांच्या कार्यकाळानंतर घेतला निर्णय
Sonia Gandhi
इटलीत २७ लाखांचं घर, एक किलो सोनं आणि…जाणून घ्या सोनिया गांधींकडे किती आहे संपत्ती?
former president jair bolsonaro marathi news, jair bolsonaro latest news in marathi, brazil latest news in marathi
विश्लेषण : ब्राझीलचे माजी अध्यक्ष ‘ट्रम्पभक्त’ जाइर बोल्सोनारो पुन्हा अडचणीत? वर्षभरापूर्वी केलेला बंडाचा प्रयत्न किती भोवणार?

मुमताज आणि आशा भोसले यांचा एका पार्टीतला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मुमताज लोफर चित्रपटातील ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. तसेच त्या आशा भोसलेंनाही नाचण्याचा आग्रह करताना दिसत आहेत. मुमताज यांच्या आग्रहानंतर आशा भोसलेंनी मुमताज यांच्याबरोबर ठेका धरला.

१९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लोफर’ चित्रपटातील हे गाणे मुमताज यांच्यावर चित्रित करण्यात आले होते आणि ते आशा भोसले यांनी गायले होते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता जवळपास ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, आजही मुमताज यांना त्याच अंदाजात नाचताना बघून अनेकांना त्यांच्या चित्रपटाची आठवण झाली. मुमताज आणि आशा भोसले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

‘दो रास्ते’, ‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘रोटी’, ‘अपराध’सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये मुमताज यांची भूमिका चांगलीच गाजली. ७० च्या दशकात त्या टॉपच्या अभिनेत्री मानल्या जायच्या. त्याकाळी राजेश खन्ना, शम्मी कपूर, शशी कपूर सारख्या टॉपच्या अभिनेत्यांबरोबर मुमताज यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वयाच्या पंचाहत्तरीमध्येही मुमताज तेवढ्याच सुंदर दिसतात. मुमताज अजूनही नेहमी जिममध्ये जाऊन वर्कआऊट करत असतात. अनेकदा त्यांनी आपल्या वर्कआऊटचे व्हिडीओही सोशल मीडयावर शेअर केले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumtaz asha bhosle dances on koi sehri babu song video viral dpj

First published on: 05-12-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×