चित्रपटगृहात सुपरहिट पण IMDB वर निघाली ‘पठाण’ची हवा, ‘इतक्या’ प्रेक्षकांनी दिलं १० पैकी १ रेटिंग

अनेकांनी हा चित्रपट त्यांना आवडला नसल्याचं सांगितलं.

pathaan 1

२०२३ मधील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पठाण’ हा कालच सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. त्याचं कारण म्हणजे शाहरुख खान चार वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटाला शाहरुखचे चाहते चित्रपटगृहात तुफान प्रतिसाद देताना दिसत आहेत. पण IMDB वर मात्र या चित्रपटाची दांडी गुल झाली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

काल हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला सर्वत्र तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल होत आहेत. पण त्याच वेळी IMDB या साइटवर मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलं रेटिंग दिलेलं नाही. हा चित्रपट त्यांना आवडला नसल्याचं सांगितलं.

आणखी वाचा :

हा चित्रपट पाहिल्यावर ४९.६ % लोकांनी या चित्रपटाला १० पैकी १० रेटिंग दिलं आहे. ५.६% लोकांनी या चित्रपटाला १० पैकी ९ रेटिंग दिलं. तर ३.२ % लोकांनी या चित्रपटाला १० पैकी ८ गुण दिले. पण या चित्रपटाला दहा पैकी एक रेटिंग देणाऱ्यांची संख्या यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. ३१ % लोकांनी या चित्रपटाला १० पैकी १ रेटिंग दिलं आहे. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जरी यशस्वी कामगिरी करत असला तरी प्रेक्षकांच्या मनात त्याप्रमाणात घर करू शकला नाहीये.

हेही वाचा :

या चित्रपटाचे सगळे शो हाउसफुल होताना दिसत आहेत. तसंच हा वाढता प्रतिसाद बघून या चित्रपटाचे अनेक शो वाढवण्यात आले आहेत. तसंच पहिल्याच दिवशी हा चित्रपट देशभरातून पन्नास कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 12:56 IST
Next Story
“असे चित्रपट…”, शाहरुख खानच्या ‘पठाण’वर कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया
Exit mobile version