Premium

आलिया भट्ट पूजाची बहीण नाही तर मुलगी? अभिनेत्रीने वृत्तांवर सोडलं मौन, म्हणाली, “आपल्या देशात…”

आलिया भट्ट पूजा व महेश भट्ट यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या रिपोर्ट्सवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया

pooja bhatt on alia bhatt being her daughter
आलिया बहीण नाही तर मुलगी असण्याच्या चर्चांवर पूजा भट्ट काय म्हणाली?

महेश भट्ट आणि त्यांची मुलगी पूजा भट्ट यांनी एका मासिकाच्या कव्हरसाठी फोटोशूट केले होते, ज्यावरून बराच वाद झाला होता. यानंतर महेश भट्ट यांनी एका मुलाखतीदरम्यान पूजाबद्दल वक्तव्य केलं होतं. जर पूजा त्यांची मुलगी नसती तर त्यांनी तिच्याशी लग्न केलं असतं, असं ते म्हणाले होते. महेश यांच्या या वक्तव्यानंतर आलिया ही महेश आणि पूजाची मुलगी असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता पूजाने या रिपोर्ट्सवर प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडिलांना लिप किस केल्यानंतर झालेल्या वादावर पूजा भट्टचं ३३ वर्षांनी भाष्य; म्हणाली, “मला शाहरुख खानने…”

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत पूजा भट्टने वरील मीडिया रिपोर्ट्सवर अखेर मौन सोडले. “आपल्या देशात हे नवीन नाही. कोणाच्या तरी मुलीशी किंवा वहिनीशी किंवा त्यांच्या बहिणीशी किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टींबद्दल बोलणं सुरू करा. आता तुम्ही ही गोष्ट कशी थांबवाल? तुम्ही या गोष्टीबद्दल काही प्रतिसाद देऊ शकाल का? हा मुर्खपणा आहे,” असं पूजा भट्ट म्हणाली.

“दुसरी आई बनून तिने…”, वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठ्या बहिणीबद्दल बोलला गश्मीर महाजनी

यावेळी पूजाने वडिलांसोबतच्या लिप किसवरून झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली. पूजा म्हणाली, “दुर्दैवाने त्या क्षणांचे अनेकांकडून चुकीचे वर्णन केले गेले. शाहरुख खाननेही मला हेच सांगितलं होतं. हा एक निष्पाप क्षण कॅप्चर केला होता ज्याचे खूप वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. ज्याला जे करायचंय ते करतात. मी इथे बसून त्याचा बचाव करणार नाही. जर कोणी वडील व मुलीच्या नात्याबद्दल असे प्रश्न उपस्थित करत असतील तर ते कितीही वाईट विचार करू शकतात.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pooja bhatt breaks silence on reports claiming alia bhatt is her daughter not sister hrc

First published on: 12-09-2023 at 16:10 IST
Next Story
कपूर कुटुंबातल्या मुली-सूनांना चित्रपटात काम करण्याची परवानगी का नव्हती? करीना कपूरने केला खुलासा, म्हणाली..