बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाने अमेरिकन गायक निक जोनसशी लग्न केले. या दोघांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांमध्ये जवळपास १० वर्षांचा फरक आहे. प्रियांका निकपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. प्रियांका चोप्राने हिंदू रितीरिवाजांनुसार राजस्थानच्या उदयपूरमध्ये निकबरोबरच लग्न केले. या विवाहाबद्दल आता प्रियांकाने एक मोठा खुलासा केला आहे.

प्रियांका चोप्रा सध्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. नुकतंच प्रियांकाने ‘ब्रिटीश वोग’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला.
आणखी वाचा : विराजस कुलकर्णी-शिवानीची रोमँटिक ट्रीप, मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे एका दिवसाचे भाडे किती? 

“राजस्थानच्या उदयपूरमध्ये माझे आणि निकचे लग्न झाले. त्यावेळी निकचे संपूर्ण कुटुंब भारतात आले होते. त्याचे आई-वडील, दोन भाऊ, त्याचे मित्र आणि निकचा लहान भाऊ हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते. या भव्य सोहळ्यात मी आणि निकने हिंदू पद्धतीने सप्तपदी घेतली. तसेच त्यापूर्वी आम्ही दोघेही ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झालो होतो”, असे प्रियांकाने सांगितले.

“आमच्या लग्नाचा मुहूर्त रात्री १० वाजता होता. त्यावेळी ते सगळेजण अमेरिकेवरुन आले होते. त्यावेळी भारत आणि अमेरिकेतील वेळेच्या फरकामुळे त्यांना जेट लॅग होता. मी तेव्हा निककडे पाहत होते आणि तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहत होता. कारण ते सर्वजण सतत डुलक्या काढत होते. ते फारच मजेशीर होते”, असे प्रियांका म्हणाली.

आणखी वाचा : गोपीनाथ मुंडेंचे निधन ते प्रीतम मुंडेंची खासदारकी, पंकजा मुंडेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने डिसेंबर २०१८ मध्ये निक जोनाससोबत लग्न केले. जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाह पार पडला होता.