गुरुवारी शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई ईडीकडून करण्यात आली. याबाबत शिल्पा किंवा राजने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण राज कुंद्राने सोशल मीडियावर शेअर केलेली स्टोरी चर्चेत आली आहे.

गुरुवारी ईडीने शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली. मनी लाँडरिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेला फ्लॅट शिल्पा व राज यांचा पुण्यातील बंगला व राज कुंद्राच्या नावावर असलेले इक्विटी शेअर्स ईडीकडून जप्त करण्यात आले. याचदरम्यान आता राज कुंद्राच्या इन्स्टाग्राम स्टोरीने लक्ष वेधून घेतलं आहे.

Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर

राज कुंद्राने डरकाळी फोडणाऱ्या सिंहाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर “जेव्हा तुम्हाला अपमानित वाटत असतं, तेव्हा शांत राहायला शिकणं ही वेगळ्या प्रकारची प्रगती (ग्रोथ) आहे,” असं लिहिलं आहे. ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात अद्याप शिल्पा किंवा राजने प्रतिक्रिया दिलेली नाही, पण राजच्या या इन्स्टाग्राम स्टोरीची चर्चा होताना दिसत आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त

राज कुंद्राची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, ईडीने शिल्पा व राजच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई केल्यानंतर अभिनेत्री सलमान खानच्या घरी गेली होती. गुरुवारी सलमान खानच्या घरी जातानाचे शिल्पा व तिच्या आईचे व्हिडीओ समोर आले होते. सलमान खानच्या घरावर रविवारी गोळीबार झाला होता, त्यानिमित्ताने त्याची भेट घेण्यासाठी शिल्पा वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील अभिनेत्याच्या घरी गेली होती.