अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा यांची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. अभिनेत्रीची संपत्ती जप्त झाल्यानंतर ती तिच्या घरातून सलमान खानच्या घरी जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

शिल्पा शेट्टी तिची आई सुनंदा यांच्याबरोबर वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घरी गेली. सलमान खानच्या घरावर तीन दिवसांपूर्वी पहाटे गोळीबार झाला होता. तेव्हापासून अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आहे. आता शिल्पाही आईबरोबर सलमानच्या घरी गेली. तिच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याची बातमी आल्यानंतर ती पहिल्यांदाच घराबाहेर पडली आणि सलमानच्या घरी गेली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ९७.७९ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त

अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) पहाटे गोळीबार झाला. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगच्या अनमोल बिश्नोईने घेतली होती. सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या दोघांनाही गुजरातमधील भुज येथून सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी केली जात आहे.

सुशांतसिंह राजपूतच्या जाण्याचं दुःख कुणालाच नाही, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे स्पष्ट मत; म्हणाले, “त्याच्या निधनानंतर शोकसभा…”

दरम्यान, राज कुंद्रा व शिल्पाच्या संपत्तीवर ईडीने कारवाई केली आहे, पण त्या दोघांपैकी कुणीही अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पॉन्झी घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आली आहे. शिल्पाचा जुहूतील फ्लॅट, पुण्यातील बंगला व राज कुंद्राच्या नावावरील इक्विटी शेअर्सवर ईडीने जप्ती आणली आहे.