Premium

राखी सावंतने आदिल खानबरोबरच्या लग्नाचे सर्व पुरावे केले उघड; म्हणाली, “मी इस्लाममधील नियमांचं पालन केलं अन् आता…”

लग्नाच्या प्रमाणपत्रापासून ते व्हिडीओपर्यंतचे सर्व पुरावे राखी सावंतने सोशल मीडियावर केले उघड

rakhi sawant shared all proof of marriage with adil khan durrani
लग्नाच्या प्रमाणपत्रापासून ते व्हिडीओपर्यंतचे सर्व पुरावे राखी सावंतने सोशल मीडियावर केले उघड

बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आहे. मागील महिन्यात पती आदिल खानने म्हैसूरच्या जेलमधून बाहेर येताच राखीवर गंभीर आरोप केले. ड्रग्ज देण्यापासून ते न्यूड व्हिडीओ काढण्यासह अनेक गंभीर आरोप आदिलनं राखीवर केले. पण त्यानंतर राखीनं सुद्धा पत्रकार परिषद घेऊन आदिलला प्रत्युत्तर दिलं. एवढ्यावरचं हे प्रकरण काही थांबलं नाही. अजूनही आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. अशातच आता राखीनं सोशल मीडियावर अनेक पुरावे शेअर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2023: ढोल ताशांच्या गजरात ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या घरच्या बाप्पाचं आगमन; पाहा व्हिडीओ

सुरुवातीला राखीनं इन्स्टाग्रामवर आदिलबरोबर झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये आदिल इंडस्ट्रीमध्ये काम मागताना दिसत आहे. त्यानं लिहीलं आहे की, ‘माझ्यासाठी गाणी घेऊन ये यार. मी लॉकअप किंवा बिग बॉसमध्ये जाऊ इच्छित आहे. मला काहीतरी करायचं आहे.’ याला उत्तर देत राखीनं लिहीलं आहे की, ‘ठीक आहे.’ या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर करतं तिनं लिहीलं आहे की, “त्यानं बिग बॉसमध्ये जाण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी सर्व काही करत असल्याचं मला माहित होतं. त्यानं प्रसिद्ध होण्यासाठी माझा वापर केला. मी इस्लाममधील नियमांचं पालन केलं आणि आता त्यानं माझा विश्वासघात केला.”

हेही वाचा – “हा मला एका महिन्यात मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार”; गायक सलील कुलकर्णींच्या ‘त्या’ पोस्टनं वेधलं लक्ष

यानंतर राखीनं लग्नाचे सर्व पुरावे उघड केले. तिनं उर्दू भाषेत लिहिलेलं लग्नाच प्रमाणपत्र आणि व्हिडीओ शेअर केला आहे. हे शेअर करत राखीनं लिहीलं की, “मी आदिलशी लग्न केलं आणि मुस्लिम नाव देखील स्वीकारलं. लग्नाच्या प्रमाणपत्रावर फातिमा स्पष्टपणे दिसत आहे.”

हेही वाचा – Video: अविनाश-ऐश्वर्या नारकरांनी केलेलं ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’चं नवीन व्हर्जन पाहिलंत का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

हेही वाचा : गौरी सावंत यांच्याबरोबर ‘ताली’ टीमनं पाहिलं ‘चारचौघी’ नाटक; रवी जाधव म्हणाले, “असं क्वचितच…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखीला ‘हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम धर्म स्वीकारलास’, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर राखी म्हणाली होती की, “हिंदू धर्मात कधीच काही चुकीचं, वाईट नव्हतं. मी मुस्लिमाशी लग्न केलं, निकाह केला होता, त्यामुळे जेव्हा तुम्ही निकाह करता तेव्हा तुम्हाला इस्लाम कबूल करावा लागतो. मी मागच्या वर्षभरापासून विवाहित आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला मक्का-मदीना जायला मिळालं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rakhi sawant shared all proof of marriage with adil khan durrani pps

First published on: 19-09-2023 at 11:49 IST
Next Story
Video : लग्नाअगोदर परिणिती चोप्रा व राघव चड्ढा यांचे घर सजलं; रोषणाई केल्याचा व्हिडीओ आला समोर