बॉलीवूड अभिनेता जॅकी भगनानी व अभिनेत्री रकुल प्रीत सिंग २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. गोव्यात त्यांच्या शाही लग्नसोहळ्याची तयारी करणात आली होती. कुटुंबीय व जवळच्या मित्र-मैत्रीणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. जॅकी व रकुलच्या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर गोव्यात समुद्रकिनारी दोघांनी लग्नगाठ बांधली. रकुल व जॅकीच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. जॅकीने पांढऱ्या रंगाची शेरवानी परीधान केली होती तर रकुलने बेबी पिंक रंगाचा सुंदर लेहंगा व त्यावर भरजरी दागिने घातले होते. या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

हेही वाचा- “कितीही अंधार पडला तरी…”; घटस्फोटाच्या घोषणेनंतर ईशा देओलने शेअर केली पहिली पोस्ट, म्हणाली…

आता लग्नानंतर दोघे मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईतील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रकुल व जॅकी पापराझींना पोझ देताना दिसत आहेत. यावेळी रकुलने सोनेरी रंगाची अनारकली ड्रेस परिधान केला होता. भांगेत कुंकू, हातात चुडा घातलेली रकुल खूपच सुंदर दिसत होती. तर जॅकीने पांढऱ्या रंगाची चिकन वर्क केलेली शेरवानी घातली होती. यावेळी दोघांनी पापराझींना लाडूचेही वाटप केले.

लग्नानंतर रकुल-जॅकी हनिमूनला कुठे जाणार?

गोव्यात लग्न केल्यानंतर रकुल व जॅकी हनिमूनला कुठे जाणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, रकुल व जॅकीने लग्नानंतर हनिमूनला जाण्याची योजना रद्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण- व्यग्र वेळापत्रकामुळे दोघे लग्नानंतर काही दिवसांमध्येच कामावर परतणार आहेत.