आलिया भट्ट आणि रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांची मुलगी राहा त्यांच्या आयुष्यात आली. ती एक वर्षाची झाल्यानंतर आलिया आणि रणबीरने तिला मीडियासमोर आणले. तेव्हा राहाचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि राहा आलियासारखी दिसते की रणबीरसारखी यावर चर्चाही सुरू झाली होती.

रणबीर कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, राहासाठी आलिया भट्ट रोज ई-मेल लिहिते. त्यावर अलीकडेच झालेल्या मुलाखतीत आलियाने राहाला रोज ई-मेल करण्यामागचे कारण स्पष्ट केले. मजेशीर गोष्ट अशी की, राहाच्या जन्माआधीच आलियाने राहासाठी ई-मेल लिहायला सुरुवात केली होती. या मेलमध्ये आपल्या मुलीबद्दलच्या भावना, विचार व उमेद आहेत, असे तिचे मत होते.

हेही वाचा… दिव्या अग्रवालशी लग्न करताना अपूर्वने बाळगली तिच्या दिवंगत वडिलांची ‘ही’ वस्तू, अभिनेत्री भावुक होत म्हणाली…

ग्लास मॅगझिनच्या एका मुलाखतीत आलिया म्हणाली होती, “मी माझ्या मुलीला रोज ई-मेल करते. तिच्या आईनं तिचं संगोपन कसं केलं हे लक्षात राहण्यासाठी मी हे करते. मी ई-मेलसह राहाचे फोटोजही त्यात समाविष्ट करते.”

हेही वाचा… “माझे अपहरण तुमच्या भक्तांनी…”, पाच वर्षांनी विक्रांत मेस्सीने ‘त्या’ पोस्टबद्दल मागितली माफी; म्हणाला, “हिंदू समुदायाला…”

ई-मेलमधल्या गोष्टींचा खुलासा करीत आलिया म्हणाली, “मी एक ई-मेल आयडी तयार केला आणि मुलीसाठी लिहू लागली.” त्यात आलिया राहासाठी काही अशा गोष्टी लिहायची, “मी तुला हे सांगणार नाही की, पुढे जाऊन तुला काय करायचंय आणि काय नाही. तुझी आई असल्यानं तुझं स्वतःचं व्यक्तिमत्त्व असावं, असं मला वाटतं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की, तू तुझ्या आयुष्यात काहीही कर, स्वतःवर, तुमच्या नातेसंबंधावर आणि तुझ्या करिअरवर मेहनत कर.”

हेही वाचा… सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ चित्रपटाचं पोस्टर अनोख्या पद्धतीने केलं लाँच; पाहा खास Video

पुढे आलियाने लिहिले, “कितीही कठीण प्रसंग आले तरी आपण नेहमी इतरांसाठी उदार असलं पाहिजे. कारण- ते कोणत्या संघर्षातून जात आहेत हे आपल्याला माहीत नसतं.” आलियाने असे म्हटले की, ही कल्पना ती प्राचीन भारतीय शिकवणुकीतून शिकली आहे.

दरम्यान, आलिया भट्टच्या कामाबाबत सांगायचे झाल्यास जिगरा या आगामी चित्रपटाद्वारे आलिया प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.