सिद्धार्थ मल्होत्रा हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असून त्याचा आगामी चित्रपट ‘योद्धा’ १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढण्यासाठी निर्मात्यांनी चांगलीच तयारी केली जात आहे. ‘योद्धा’ चित्रपटाचे पोस्टर अनोख्या पद्धतीने सादर करण्यात आले. ‘योद्धा’ च्या टीमने हे पोस्टर हॅलिकॉप्टरच्या मदतीने हवेत लाँच केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट अनेक अडथळ्यांचा सामना केल्यानंतर आता १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेल्या ‘योद्धा’ चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. हॅलिकॉप्टरच्या साहाय्याने हवेत उंच ठिकाणाहून हे पोस्टर लाँच करण्यात आले. या पोस्टर-लाँचचा व्हिडीओ सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आणि कॅप्शन दिले, “थेट तुमच्या स्क्रीनवर थ्रिल एअरड्रॉप! तुमच्यासह हा प्रवास अनुभवताना मी खूप आनंदी आहे. “

टीझर रिलीजची तारीख शेअर करत त्याने पुढे लिहिले, “योद्धाचा टिझर १९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. योद्धा १५ मार्च राजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.” ‘योद्धा’ हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरला ज्याचे अशा अनोख्या पद्धतीने पोस्टर लाँच करण्यात आले.

हेही वाचा… दिव्या अग्रवाल मराठमोळ्या बॉयफ्रेंडशी घरीच बांधणार लग्नगाठ; कारण सांगत म्हणाली, “५ स्टार हॉटेल…”

दरम्यान, या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर, या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासह दिशा पटानी आणि राशी खन्ना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी एकत्रित याची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra starrer yodha film poster launch in mid air in dubai video viral dvr
First published on: 15-02-2024 at 18:04 IST