IPL 2024 चा ६८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज या संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा २७ धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. आयपीएलमध्ये सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खराब कामगिरी केलेल्या आरसीबीच्या संघाने या खेळात शेवटच्या क्षणाला जोरदार पुनरागमन केलं. संघ विजयी झाल्यावर विराट कोहलीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी स्टेडियममध्ये अनुष्का शर्मा देखील उपस्थित होती.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय फलंदाज विराट कोहलीची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. स्टेडियमध्ये दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. अनुष्का लंडनहून परतल्यावर गेल्या काही सामन्यांपासून पती विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचतेय. शनिवारच्या सामन्याला देखील ती चिन्नास्वामी स्टेडियमवर उपस्थित होती. पतीच्या संघाने विजय मिळवल्यानंतर अभिनेत्रीच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसले. याचा व्हिडीओ आरसीबीच्या अधिकृत एक्स पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : RCB ने प्लेऑफ गाठल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची फक्त एका शब्दाची पोस्ट, म्हणाला…

बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि चेन्नई संघांमध्ये आयपीएलचा ६८ सामना खेळवण्यात आला. यादरम्यान विराट कोहलीच्या आरसीबी संघाने चेन्नईवर २७ धावांनी विजय नोंदवला आणि हा संघ प्लेऑफसाठी पात्र झाला. मॅच जिंकल्यावर विराटसह संपूर्ण RCB संघाने मैदानात एकच जल्लोष केला. सुरुवातीचे सामने हरल्यावर टीमने अशाप्रकारे जोरदार पुनरागमन केल्यामुळे विराट भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : आधी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई, नंतर ओटीटी रिलीजसाठी घेतले कोट्यवधी; तुम्ही पाहिलेत का ‘हे’ बॉकबस्टर दाक्षिणात्य चित्रपट

विराटला पाहून अनुष्का सुद्धा भावुक झाली होती. दोन्ही हातांच्या मुठी घट्ट बंद करून ती सेलिब्रेशन करताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अभिनेत्रीच्या बाजूला आरसीबीच्या महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना देखील उपस्थित होती.

हेही वाचा : २५ दिवसांनी घरी परतलेल्या गुरुचरण सिंगचा बदललाय लूक, ओळखणंही झालं कठीण; पाहा पोलिसांबरोबरचा पहिला फोटो

दरम्यान, अनुष्का नेहमीच विराटला प्रोत्साहन द्यायला स्टेडियममध्ये आलेली असते. अकायच्या जन्मानंतर ती बरेच दिवस लंडनला होती. लंडनहून परतल्यावर आता अनुष्का प्रत्येक सामन्याला आवर्जुन उपस्थित असते. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी विरुष्काने त्यांच्या दुसऱ्या मुलाचं म्हणजेच अकायचं स्वागत केलं. परंतु, अद्याप विराट-अनुष्काने त्यांच्या दोन्ही मुलांचे चेहरे मीडियाला दाखवलेले नाहीत.