Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection Day 6 : सलमान खानचा मल्टिस्टारर चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडली आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. वीकेंडला चांगली कमाई करणारा चित्रपट प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी मात्र गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत पोहोचला आहे. चित्रपटाने मंगळवारी केलेल्या कमाईच्या तुलनेत बुधवारी खूपच कमी गल्ला जमवता आला आहे.

हेही वाचा – सानिया मिर्झाशी घटस्फोट घेण्याच्या चर्चांबाबत अखेर शोएब मलिकने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही दोघेही…”

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
pune cp amitesh kumar marathi news
पोलीस आयुक्तांचा गुंडांना इशारा : म्हणाले, “पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ नाही, आता ‘हा’ पॅटर्न…”
Share Market Sensex and Nifty
सेन्सेक्स आणि निफ्टीने रचला नवा इतिहास; बाजार भांडवल पहिल्यांदाच पोहोचले ४०० लाख कोटींवर
Royal Enfield Bullet Fire On Road In pune Bullet catches fire due to extreme heat
पुणेकरांनो सावधान! पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक; VIDEO होतोय व्हायरल

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘किसी का भाई किसी की जान’ ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी फक्त पाच कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ८७.१५ कोटींवर पोहोचली आहे. चित्रपटाच्या कमाईतील घसरण पाहता पहिल्या आठवड्यात चित्रपट देशभरात १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामील होईल, अशी चिन्हे दिसत नाहीयेत. कमाईत सातत्याने घसरण होत आहे, त्यामुळे वीकेंडला कदाचित आकड्यांमध्ये थोडी सुधारणा दिसू शकते, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

हेही वाचा – कुमार सानूंच्या मुलीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा खुलासा करत म्हणाली…

जगभरात चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. पण देशभरातील थिएटर्समध्ये मोठ्या स्तरावर प्रदर्शित करण्यात आलेला चित्रपट १०० कोटींचा आकडा गाठू शकलेला नाही. आतापर्यंतची आकडेवारी पाहता सलमान खानसह पूजा हेगडे, जस्सी गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी, शहनाज गिल, विनाली भटनागर तसेच दाक्षिणात्य कलाकारांच्या भूमिका असल्या तरी हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकू शकलेला नाही.