scorecardresearch

अथिया शेट्टी-केएल राहुलला लग्नात खरंच कार, फ्लॅटसारख्या महागड्या भेटवस्तू मिळाल्या का? सुनील शेट्टी खुलासा करत म्हणाला…

अथिया व केएल राहुलच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर या जोडप्याला भेटवस्तू मिळाल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. या चर्चांबद्दल आता सुनील शेट्टीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

suniel-shetty-on athiya-kl-rahul-wedding gifts
(फोटो – इन्स्टाग्राम)

सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने तिचा बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू केएल राहुलशी सोमवारी (२३ जानेवारी) लग्नगाठ बांधली. या जोडप्याने सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये लग्न केलं. लग्नाला अगदी मोजकेच पाहुणे उपस्थित होते. अथिया व केएल राहुलच्या लग्नाच्या काही दिवसांनंतर या जोडप्याला भेटवस्तू मिळाल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या. या चर्चांबद्दल आता सुनील शेट्टीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

“…म्हणून मी कायम आईचं मंगळसूत्र घालतो”, प्रसिद्ध गायकाने केला खुलासा

सलमान खान, विराट कोहली यांनी गाड्या भेट दिल्याची बातमी होती. तर, खुद्द सुनील शेट्टींनी लेक व जावयाला ५० कोटींच्या फ्लॅट दिल्याचं त्यात म्हटलं होतं. याशिवाय महेंद्र सिंह धोनी, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांनीही महागड्या भेटवस्तू दिल्याचं म्हटलं जात होतं, पण आता सुनील शेट्टीने हे सर्व दावे निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं आहे.

फक्त ४ चित्रपटांत दिसलेली अथिया शेट्टी आहे कोट्यवधींची मालकीण; जाणून घ्या तिची व केएल राहुलची एकूण संपत्ती किती?

नवविवाहित जोडप्याला एक अपार्टमेंट, आलिशान कार आणि दागिने भेट देण्यात आल्याचं वृत्त समोर आल्यानंतर इंडियन एक्सप्रेसने सुनील शेट्टीच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला. त्यांनी या सर्व अफवांचे खंडन केले आहे. “भेटवस्तूंबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या या खोट्या आणि निराधार आहेत. त्यात काहीच सत्य नाही. सार्वजनिक डोमेनमध्ये अशी चुकीची माहिती देण्यापूर्वी आमच्याशी संपर्क साधून त्याची खातरजमा करा,” अशी विनंती सुनील शेट्टीच्या प्रवक्त्यांनी केली आहे.

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाच्या विधींना शनिवारी सुरुवात झाली होती. रविवारी रात्री, कुटुंबाने कॉकटेल नाईटसह संगीत सोहळ्याचे आयोजन केले होते. यात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर सोमवारी लग्न पार पडलं. लग्नानंतर सुनील शेट्टीने मीडियाशी संवाद साधत मुलीच्या लग्नाचा आनंद व्यक्त केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 08:24 IST