बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

गेले बरेच दिवस रणबीरचे चाहते आणि चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची दोन लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने ७ कोटींची कमाई केल्याचे समोर आले आहे. ट्रेलरवरूनच चित्रपटात भरपुर रक्तपात, हिंसा आणि खिळवून ठेवणारे अॅक्शन सीन्स असणार हे स्पष्ट झालं. या ट्रेलरमधील एका सीनमध्ये रणबीर कपूर एक भली मोठी गन चालवताना दिसला आहे. ती गन सीजीआय किंवा व्हीएफएक्सच्या माध्यमातून बनवली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. परंतु ती गन खरी बनवण्यात आली असल्याचा खुलासा नुकताच या चित्रपटाचे प्रोडक्शन डिजायनर यांनी केला आहे.

Sanjay Manjrekar brually trolled by fans
Duleep Trophy 2024 : रोहित-विराट, बुमराहच्या विश्रांतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या माजी खेळाडूला चाहत्यांचे चोख प्रत्युत्तर; म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Remembering iconic talk show host Phil Donahue
व्यक्तिवेध : फिल डॉनाह्यू
Badlapur School Case Badlapur Video Of People Help Railway Passengers video goes viral
Badlapur Case VIDEO : बदलापूरकरांनी घडवलं माणुसकीचं दर्शन; पाहा १० तास रेल्वे सेवा बंद असताना काय घडलं?
Kolkata rape-murder case
Kolkata doctor rape-murder case:पीडितेच्या पालकांनी ममता बॅनर्जींना विचारला जाब; ही दुटप्पी भूमिका का आणि कशासाठी?
Javelin thrower Neeraj Chopra opinion on 90 m distance debate sport news
अंतराबाबतची चर्चा आपण देवावर सोडूया! ९० मीटरच्या टप्प्याबाबत भालाफेकपटू नीरज चोप्राचे मत
ti phulrani dramatization by P L deshpande
‘ती’च्या भोवती : आत्मसन्मानाचं स्फुल्लिंग!
Susan Wochetsky
व्यक्तिवेध: सुसन वोचेत्स्की

आणखी वाचा : “मी रणबीरच्या पाया पडून…” ‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केले अभिनेत्याच्या कामाचे कौतुक

नुकतंच चेन्नईमधील पत्रकार परिषदेत ‘अ‍ॅनिमल’च्या संपूर्ण टीमने हजेरी लावली व मीडियाच्या प्रश्नांना उत्तारं दिली. त्यावेळी चित्रपटाचे प्रोडक्शन डिजायनर सुरेश सेलवाराजन यांनी या गोष्टीचा खुलासा केला. ५०० कीलोची पूर्णपणे स्टीलची ही अवाढव्य गन बनवण्यासाठी त्यांना ४ महिन्यांचा कालावधी लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटाच्या मध्यांतरादरम्यान या वॉर मशीनचा सीन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तब्बल १८ मिनिटांचा हा सिक्वेन्स असणार आहे. याबद्दल सुरेश म्हणाले, “भारतीय चित्रपटात अशी गोष्ट घडताना मी प्रथम पाहतो आहे, याचे सर्व श्रेय संदीपचे आहे.”

तिथे उपस्थित असलेल्या रणबीर कपूरनेही यावर टिप्पणी केली. रणबीर म्हणाला, “जेव्हा सुरेश अण्णा यांनी हे वॉर मशीन जेव्हा आम्हाला दाखवलं तेव्हा मी ते पाहून हबकलोच होतो. त्यांनी फार मेहनत घेऊन ही गन बनवली. संदीप आणि सुरेश अण्णा यांचीच ही कल्पना होती. आम्ही चित्रपटात खऱ्या खुऱ्या बंदुका चालवलेल्या नाहीत. एवढी मोठी मशीन गन चालवताना आपल्या शरीरावर, कानावर कसे परिणाम होतील याचा विचारही करवत नाही. या सगळ्याचा विचार करून मला अभिनय करायचा होता, कारण गोळ्या खऱ्या नव्हत्याच, मला वाटतं हीच खरी जादू आहे सिनेमाची.”

‘अ‍ॅनिमल’ची सध्या जोरदार चर्चा आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त तिकीटविक्री केली आहे. चित्रपटप्रेमी व रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल व रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ डिसेंबरला विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’सह ‘अ‍ॅनिमल’ प्रदर्शित होणार आहे त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.