बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करायला कलाकारांना प्रचंड मेहनत करावी लागते. त्यातही नवखा कलाकार असेल तर त्याला इथे काम मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष चुकत नाही. विद्या बालन आणि प्रतीक गांधी यांनी इंडियन एक्स्प्रेस ‘एक्सप्रेसो’ मालिकेच्या पहिल्या भागात हजेरी लावली. त्यांनी या मुलाखतीत अनेक प्रश्ंनाची उत्तरं दिली. इंडस्ट्रीत यशस्वी होण्याआधी कामासाठी पचवलेले नकार, ऐकावे लागलेले टोमणे याबद्दलही त्यांनी सांगितलं.

सिनेसृष्टीतील नेपोटिझम हा कायम चर्चेत राहणारा विषय आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये पक्षपातीपणा अनुभवयाला मिळाला का, असा प्रश्न विद्या बालनला विचारण्यात आला. “नेपोटिझम असो किंवा नसो, मी इथे आहे. इंडस्ट्री कोणाच्या बापाची नाही, तसं असतं तर आज प्रत्येक बापाचा मुलगा आणि प्रत्येक बापाची मुलगी यशस्वी असते (सर्व स्टार किड्स यशस्वी झाले असते),” असं स्पष्ट उत्तर विद्या बालनने दिलं.

अजय देवगण की अक्षय कुमार, कोणाच्या चित्रपटाने केली ग्रँड ओपनिंग? दोन्ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन….

प्रतीक गांधीचा संघर्ष

प्रतीकने त्याची इंडस्ट्रीतील सुरुवात ते यशापर्यंतचा त्याचा प्रवास सांगितला. सुरतहून मुंबईत आल्यानंतर त्याला खूप संघर्ष करावा लागला. “टीव्हीवर मला रिजेक्ट केलं गेलं. मी दिलेल्या सर्व ऑडिशन्समध्ये मला नकार मिळाला. त्या निर्मात्यांची टेलिव्हिजन शोसाठी अभिनेत्याची कल्पना थोडी वेगळी होती. मी त्यात फिट बसत नव्हतो. ते विशिष्ट शरीरयष्टीचे, विशिष्ट त्वचेचा रंग असलेले आणि एक विशिष्ट लूक असलेले अभिनेते शोधत होते,” असं प्रतीक म्हणाला.

अवघ्या २० कोटींचं बजेट अन् कमावले २२५ कोटी, एकही अभिनेत्री नसलेला ‘हा’ सिनेमा ओटीटीवर होणार प्रदर्शित

विद्या बालनला मिळालेले नकार

बालनने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं. “मी तीन वर्षे हार्टब्रेकमधून जात होते. सारखे नकार मिळत होते आणि त्यामुळे मला त्रास होता. मी अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते आणि या क्षेत्रात पुढे जाण्याची माझी इच्छा होत नव्हती. पण माझ्या मनात काहीतरी करायची आग होती जी या सर्व नकारांपेक्षा मोठी होती,” असं विद्या म्हणाली.

विद्या आणि प्रतीक यांनी ‘दो और दो प्यार’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यात त्यांनी एका विवाहित जोडप्याची भूमिका केली आहे. यात इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती यांच्याही भूमिका आहेत. चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.