बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या त्याच्या ‘12th fail’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाला यंदाचे बरेच फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले. सामान्य प्रेक्षकांपासून बऱ्याच सेलिब्रिटीजपर्यंत कित्येकांनी विक्रांतच्या अभिनयाचे आणि त्याच्या या चित्रपटाचे कौतुकही केले. चित्रपटक्षेत्रात येण्याआधी विक्रांतने बऱ्याच टीव्ही सिरियल्समध्ये काम केलं ज्यातून त्याला लोकप्रियता मिळाली.

नुकतंच एका मुलाखतीदरम्यान विक्रांतने त्याच्या या प्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. ‘Unfiltered by Samdish’ या यूट्यूब पॉडकास्टमध्ये विक्रांतने हजेरी लावली अन् मनमोकळ्या गप्पा मारल्या. लहानपणापासूनच घरात विक्रांतने धर्म आणि अध्यात्म याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. यावरुन निर्माण होणारे तणाव आणि वाद याबद्दलही विक्रांतने भाष्य केलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या भावाने इस्लाम धर्म स्वीकाराला असल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
women Forcefully married with travels businessman and stolen 17 lakhs
‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले

आणखी वाचा : “आमच्याकडे प्लॅस्टिकच्या खुर्च्या…”, घरी जेवायला आलेल्या मित्रांनी विक्रांत मेस्सीला दिला आयुष्यातील सर्वात मोठा धडा

आपल्या मोठ्या भावाबद्दल बोलताना विक्रांत म्हणाला, “माझ्या भावाचं नाव मोईन आहे अन् माझं विक्रांत. तुम्हाला माझ्या भावाचं नाव ऐकून आश्चर्य वाटलं असेल. त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आहे अन् माझ्या कुटुंबाच्या परवानगीनेच त्याने धर्मपरिवर्तन केले आहे. माझ्या घरच्यांनी याबाबतीत कधीच आडकाठी केली नाही. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. माझी आई शीख आहे तर माझे वडील हे नित्यनेमाने चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करणारे ख्रिश्चन आहेत. ते आठवड्यातून दोनवेळा चर्चमध्ये जातात. लहानपणापासूनच मी धर्म या गोष्टीवरुन होणारे वाद मी फार जवळून पाहिले आहेत.”

विक्रांत पुढे म्हणाला, “माझे नातेवाईक माझ्या वडिलांना विचारायचे की तुम्ही तुमच्या मुलाला धर्म बदलूच कसा दिला. त्यावर माझे वडील त्यांना चोख उत्तर द्यायचे. ते सांगायचे, तो माझा मुलगा आहे आणि तो केवळ मला उत्तर द्यायला बांधील आहे अन् त्याला त्याच्या आयुष्यात कोणताही निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे. यामुळेच माझ्या विचारांमध्येही बराच फरक पडला, माझ्यामते धर्म हा मानवनिर्मितच आहे.”

विक्रांतने शीतल ठाकूरशी लग्नगाठ बांधली अन् नुकतंच त्यांनी शीतल गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावरुन शेअर केली. आपल्या मुलावरही आपण तसेच संस्कार करणार असल्याचा खुलासाही विक्रांतने या मुलाखतीमध्ये केला. पण ज्या गोष्टी या भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या आहेत अन् ज्या आपण लहानपणापासून बघत आलो आहोत त्या आपण पाळायलाच हव्यात असंही विक्रांतने स्पष्ट केलं.

याचं उदाहरण देताना विक्रांतने दिवाळीचा संदर्भ दिला. “दिवाळी हा सण फक्त भारतात साजरा केला जातो अन् मीदेखील तो सण आनंदाने साजरा करतो कारण लहानपणीच्या बऱ्याच आठवणी या सणाशी जोडलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही धार्मिक असायलाच हवं असं अजिबात नाही. लक्ष्मी पूजन केल्यानेच घरात लक्ष्मी येते या विचारांचा मी नाही, पण मी माझ्या वडिलांना लहानपणापासून लक्ष्मी पूजन करताना पाहिलं आहे. तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. माझे वडील जरी चर्चमध्ये जात असले तरी ते माझ्या आईबरोबर पूजेला बसतात. हीच खरी आपली ओळख आहे.”