दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनाला तीन वर्षे झाली आहेत, पण ते त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, त्यांच्या अजरामर भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये कायम जिवंत असतील. यश-अपयश हा या इंडस्ट्रीतला, किंबहुना प्रत्येक कलाकाराच्या जिवनातला अविभाज्य भाग आहे. मोठ्या पडद्यावर आपल्या रोमँटिक इमेजसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी एकेकाळी अभिनयाला अलविदा करण्याचे ठरवले होते.

सोशल मीडियावरुन मैत्री, प्रपोज अन्… नम्रता संभेरावची प्यारवाली लव्हस्टोरी

ऋषी कपूर यांनी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण यामागचे कारण त्यांचा कोणताही फ्लॉप चित्रपट नसून वेगळेच कारण होते. ‘टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्ता’नुसार, ऋषी कपूर यांनी स्वत: एका मुलाखतीत कबूल केले होते की, एकेकाळी त्यांना अभिनय सोडायचा होता. २०१० मध्ये एका मुलाखतीत ऋषी कपूर म्हणाले होते की, २५ वर्षे ‘हिरो’ म्हणून काम करून कंटाळा आला होता, त्यांचं नाव मोठं होत होतं, पण ते फॅन्सी स्वेटर्समध्ये झाडांभोवती धावत मुलींचा पाठलाग करून थकले होते.

१९७१ नंतर बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित होणार हिंदी चित्रपट; ‘या’ तारखेला ‘पठाण’ होणार रिलीज

ऋषी कपूर यांनी पत्नी नीतूशी याबाबत चर्चा केली तेव्हा नितूंनी त्यांना कामात मन रमत नसेल, तर ते सोडून द्यावे असे सुचवले. ऋषी यांनी पत्नीचा सल्ला ऐकला आणि अनेक प्रोजेक्ट्समधून काढता पाय घेतला, तसेच त्या चित्रपटांची साइनिंग रक्कमही परत केली. त्यानंतर त्यांना इंडस्ट्रीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ऑफर केल्या जाऊ लागल्या. यानंतर ऋषी कपूर ‘राजू चाचा’ आणि ‘कुछ खट्टा कुछ मिठा’ या चित्रपटांमध्ये दिसले. यानंतर रोमँटिक हिरोंच्या भूमिका सोडून त्यांनी वयानुसार चित्रपट साइन केले होते.