‘जॅगीज कूकबुक’ या लोकप्रिय कुकरी शोमुळे प्रकाशझोतात आलेली प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र तिचा मृत्यू कसा झाला याचे गूढ अद्याप पोलिसांना उलगडू शकलेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगी जॉन केरळमधील कुर्वणकोनाम येथे आपल्या आईबरोबर राहात होती. घरातील स्वयंपाकगृहामध्ये जगी जॉनचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम तिच्या शेजाऱ्यांनी तिचा मृतदेह पाहिला. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. जगी जॉनच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा व्रण आढळले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. त्याचा अहवाल आल्यानंतरच जगी जॉनच्या मृत्यूचे कारण कळू शकेल.

जगी जॉन ४५ वर्षांची होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायची. ती नेहमीच व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहायची. शेवटची सोशल मीडिया पोस्ट तिने रविवारी केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrity chef jagee john found dead in her kerala home mppg
First published on: 24-12-2019 at 19:30 IST