मराठी सिनेसृष्टीतील रायजिंग स्टार अशी ओळख असलेल्या चिराग पाटीलने गेल्या वर्षी १ डिसेंबरला माजी क्रिकेटपटू आणि अभिनेते सलील अंकोला यांची कन्या सना अंकोलासोबत विवाह बंधनात अडकला. चिराग आणि सनाचे लव्ह मॅरेज असून चिरागने सनाला खूप खास पद्धतीने प्रपोज केलं होतं. चिरागने स्वतः सनासाठी गाणे लिहिले आणि ते गायलेही.

याबद्दल सांगताना चिराग म्हणाला की, ‘माझ्या आणि सनाच्या लग्नानंतरचा आमचा पहिला वॅलेंटाईन्स डे आहे. माझ्या आणि सनाच्या लव्हस्टोरी बद्दल सांगायचं झालं तर मी लहानपणापासूनच सनाला ओळखतो. सना ही अभिनेता आणि माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांची मुलगी आहे. आम्ही फॅमिली फ्रेंड्स असल्यामुळे सना आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. हळू हळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिला प्रपोज करण्यासाठी खास तिच्यासाठी मी स्वतः एक गाणं लिहिलं. माझ्या मित्राने ते गाणं चालबध्द केलं आणि मी ते गाणं स्वतः गाऊन सनाला सहा वर्षांपूर्वी प्रपोज केलं आणि सनाचा होकार मला मिळाला. त्यानंतर आमचं रिलेशनशिप अजून घट्ट झाली आणि १ डिसेंबर २०१६ ला आम्ही दोघे लग्नाच्या बंधनात अडकलो.’

houses, Mulund,
१४ वर्षांपासून घरांची प्रतीक्षा, मुलुंडमधील गृहप्रकल्पाचे केवळ २५ टक्केच काम पूर्ण
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
use molds 40 years ago on manufacturers for sugar gathi Pune
साखर गाठीसाठी नवे साचे मिळेनात; उत्पादकांवर ४० वर्षांपूर्वीचे साचे वापरण्याची वेळ

दरम्यान, प्रेम या संकल्पनेवर बेतलेला ‘लव बेटिंग’ हा नवा सिनेमा लवकरच येऊ घातला आहे. ‘एस. एन. फिल्मस एंटरटेनमेंट्स’ प्रस्तुत या सिनेमाची निर्मिती लालचंद शर्मा, सुनिता शर्मा यांनी केली असून दिग्दर्शन राजू मेश्राम करणार आहेत.

‘लव बेटिंग’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ नुकताच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते क्लॅप देऊन करण्यात आला. यावेळी सिनेमातील कलाकार व तंत्रज्ञासह नगरसेवक राजन किणी देखील उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा देत, ‘मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडच्या स्थित्यंतरांमध्ये हा सिनेमा मोलाची भूमिका बजावेल’, असे मत व्यक्त केले होते. ‘लव बेटिंग’ सिनेमाच्या निमित्ताने चिराग पाटील, काजल शर्मा, सयाजी शिंदे, अनंत जोग, राजेश शृंगारपुरे, स्मिता गोंदकर, कमलेश सावंत, वैभव मांगले, अनिकेत केळकर अशी जबरदस्त स्टारकास्ट प्रथमच एकत्र आली आहे.

प्रेम या संवेदनशील विषयातील चढ-उतार, रेखाटणारा हा सिनेमा प्रेक्षकांना निश्चितच आवडेल असा निर्माता- दिग्दर्शक यांना विश्वास आहे. सिनेमाची कथा-पटकथा व संवाद दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी लिहिले आहेत. कौतुक शिरोडकर, राजू मेश्राम लिखित यातील गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीताची साथ दिली आहे. ‘लव बेटिंग’ सिनेमाचे छायाचित्रण अनिकेत खंडागळे करणार असून वेशभूषा पूनम चाळके तर कला दिग्दर्शन अनिल वठ यांचे आहे.