सेलिब्रिटी किड्स आणि त्यांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच अनेकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला बऱ्याच सेलिब्रिटी किड्सच्या बॉलिवूड पदार्पणाविषयीही चर्चांना उधाण आलं आहे. याच सेलिब्रिटी किड्सच्या गर्दीतील एक नाव म्हणजे, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे. चंकीची ही लेक सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत नसून एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नृत्यदिग्दर्शिका फराह खानने अनन्याच्या एका फोटोवर कमेंट केल्यामुळे सध्या अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अभिनेता चंकी पांडेच्या पत्नीने म्हणजेच भावना पांडेने अनन्याचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर कमेंट करत फराह म्हणाली, ‘प्लीज हिची डीएनए टेस्ट करा. चंकी पांडेची मुलगी आणि ती ही इतकी सुंदर….’

फराहने ही कमेंट केल्यामुळे सर्वप्रथम अनेकांच्याच भुवया उंचावल्या. पण, तिने ही कमेंट विनोदी अंदाजात केली असून, त्यामध्ये कोणालाही दुखवण्याचा उद्देश नसल्याचं स्पष्ट होतं. फराह नेहमीच अशा कमेंट आणि ट्विटमुळे प्रकाशझोतात येते. मुख्य म्हणजे तिची व्यक्त होण्याची ही शैली अनेकांनाच खटकते. कारण, त्यातून बऱ्याचदा चुकीचे अर्थही काढले जातात. तिची ही कमेंट अनन्या, चंकी किंवा त्याच्या पत्नीने फारशी मनावर घेतली नसली तरीही सोशल मीडियावर मात्र याविषयीच्या बऱ्याच चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, चंकीची ही लाडकी लेक बऱ्याच सेलिब्रिटी पार्टी आणि काही कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावते. शाहरुखची मुलगी सुहाना खान हिच्यासोबतच तिची फार चांगली मैत्री असल्याचं म्हटलं जातं. सोशल मीडियावर आतापासूनच अनन्याचे फॅन पेजेस तयार झाले आहेत. तेव्हा आता पदार्पणापूर्वीच अनेकांच्या मनाचा ठाव घेणारी ही सेलिब्रिटी किड नेमकी कोणत्या चित्रपटातून या झगमगाटाच्या विश्वात पदार्पण करणार याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : … आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choreographer farah khan cant believe that ananya pandey is bollywood actor chunky pandeys daughter
First published on: 22-08-2017 at 15:23 IST