आजच्या कॅप्टनसीच्या टास्कमध्ये घराचा नवा कॅप्टन करायचा यावरून आस्ताद, रेशम, स्मितामध्ये बरीच चर्चा होणार आहे. तसेच घरामध्ये सगळे मिळून भज्या करणार आहेत. कॅप्टन तोच होणार जो विजयाचा झेंडा रोवणार. पूर्वीच्या काळी प्रतिस्पर्धी राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यावर तिथे झेंडा फडकविण्याची प्रथा होती. थोडक्यात प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करून त्याच्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झेंड्याचा प्रतिकात्मक वापर केला जाई.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅप्टनसीच्या कार्यात या झेंड्याची महत्वाची भूमिका असेल. या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्यासाठी मेघा, आस्ताद आणि पुष्कर हे तीन उमेदवार मैदानात उभे आहेत. या तिघांमध्ये कोण सरस ठरत, आपल्या विजयाचा ध्वज फडकावतो हे पाहण्यासाठी बिग बॉस यांनी ‘ध्वज विजयाचा उंच धरा रे’ हे कॅप्टनसीचे कार्य स्पर्धकांवर सोपवले आहे. या टास्कमध्ये नंदकिशोर, शर्मिष्ठा, आस्ताद आणि मेघामध्ये बरेच वाद होताना पाहायला मिळणार आहेत.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी स्पर्धकांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” या स्पर्धेचे आयोजन केले. या कार्यांतर्गत सदस्यांची तीन टीममध्ये विभागणी करण्यात आली. टीम- अ दात, टीम- ब डाबर रेड पेस्ट आणि टीम- क कॅव्हिटी. टीम अला म्हणेच दातांना टीम क मधील स्पर्धकांपासून म्हणजेच कॅव्हिटीपासून वाचविण्याची टीम बची जबाबदारी होती. “हेल्थी स्माईल” या नव्या टास्कमध्ये मेघा, पुष्कर आणि आस्तादची डाबर रेड पेस्ट ही टीम विजयी ठरली. त्यामुळे आता या तिघांमध्ये आज कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colors marathi reality show big boss todays episode precap
First published on: 15-06-2018 at 18:32 IST