करोनाचा कहर सुरु झाल्यापासून पहिल्यांदाच धारावीत करोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. मुंबईतल्या धारावीत करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले होते. त्यामुळे मुंबईकरांचं धाबं दणाणलं होतं. मात्र धारावीत करोनाचा संसर्ग संपवण्यासाठी विशेष मॉडेल राबवण्यात आलं. या धारावी मॉडेलची दखल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO नेही घेतली आहे. अशात मागील चोवीस तासात धारावीत करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान ही बातमी ऐकून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने देखील समाधान व्यक्त केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवश्य पाहा – मिथून चक्रवर्ती यांची ग्लॅमरस सून; फोटो पाहून व्हाल अवाक्

“नाताळ आपल्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन आलाय. पाहा आता धारावीमध्ये एकही करोनाचा रुग्ण नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन त्याने आपला आनंद व्यक्त केला. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अवश्य पाहा – अरबाजसोबत लग्न करणार का? जॉर्जिया म्हणाली, “लग्नाचा विचार…”

अवश्य पाहा – ऑनस्क्रीन ‘नागिन’चा बोल्ड अंदाज; पाहा ग्लॅमरस मौनीचं बिकिनी फोटोशूट

मुंबईतील धारावी परिसरात करोना चाचणी, रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंग आणि संसर्ग झालेल्या रुग्णांवर त्वरित उपचार केल्यामुळे करोनाविरोधातील लढाईत यश मिळालं. रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. आता कौतुकाची बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला नाही. धारावी मॉडेल यशस्वी झाल्यानंतर असंच मॉडेल मालेगावातही राबवण्यात आलं होतं. रुग्णांचा शोध घेणं, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व लोकांना समजावून सांगणं तसेच लक्षणं दिसल्यावर वेळीच उपाय करणं या मॉडेलमुळे फायदा झाल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही स्पष्ट केलं होतं.

धारावीसारख्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो अशी चिंता सर्वच स्तरातून व्यक्त करण्य़ात आली होती. काही जणांकडून सुरूवातीची संख्या पाहता धारावीचा ‘वुहान’ असाही उल्लेख करण्यात आला होता. परंतु त्यानंतर प्रशासनानं त्वरित या ठिकाणी आयसोलेशनची व्यवस्था नसल्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या लोकांसाठी आयसोलेशनची व्यवस्था केली. तसंच सामूहिक शौचालयाची समस्याही दूर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाचण्याही वाढवण्यात आल्या. त्यामुळे धारावीसारख्या परिसरातील रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात प्रशासनाला यश आलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus zero positive cases dharavi ajay devgan mppg
First published on: 27-12-2020 at 11:05 IST