भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याने पत्नी नताशा स्टॅनोविकसह दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. पंड्याने व्हॅलेंटाइन डेचा मुहुर्त साधत १४ फेब्रुवारीला ख्रिश्चन पद्धतीने नताशाशी विवाह केला. उदयपूर येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

लग्नानंतर हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. हार्दिक-नताशाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हार्दिकने लग्नासाठी काळ्या रंगाचं ब्लेझर परिधान केलं होतं. तर पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये नताशाचं सौंदर्य खुलून आलं होतं. याआधी हार्दिक-नताशाने लॉकडाऊनमध्ये पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. त्यांना अगस्त्य नावाचा मुलगाही आहे.

Mumbai Indians captain Hardik Pandya arguing with umpire
DC vs MI : दिल्लीच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर हार्दिक पंड्या अंपायरवर संतापला, काय होत कारण?
Delhis Vada Pav Girl Get Into Ugly Fight With Crowd On Streets
“ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा>> “रितेशपासून दूर राहा” पहिल्या पतीबाबत कमेंट करणाऱ्याला राखी सावंतचं उत्तर, म्हणाली “तो माझा…”

हार्दिकने नताशासह दुसऱ्यांदा विवाह केल्याने नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. हार्दिकने शेअर केलेल्या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केल्यामुळे हार्दिकला ट्रोल केलं आहे. “मुलीसाठी धर्म बदलला”, असं एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “मुलीच्या प्रेमात इतका वेडा झाला की स्वत:हिंदू आहे हे विसरुन गेला”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा>> सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीचा ‘गोल्ड डिगर’ असा उल्लेख, म्हणाला…

कित्येकांनी अगस्त्यवरुन कमेंट करत हार्दिक-नताशाला ट्रोल केलं आहे. “मी आई-वडिलांचं लग्न पाहिलं आहे, असं हार्दिकचा मुलगा म्हणेल”, अशी कमेंट एकाने केली आहे. “हा पहिला मुलगा असेल, ज्याने त्याच्या आई-वडिलांचं लग्न पाहिलं”, असं एकाने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “तुमच्या लग्नात मी का नव्हतो, असं अगस्त्य आई-वडिलांना विचारणार नाही”, अशी कमेंट केली आहे.