scorecardresearch

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा अखेर दिसला, पाहा झलक

आता त्या दोघांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

Gurmeet Debina Daughter photos

अभिनेत्री देबिना बॅनर्जी ही मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गुरमीत चौधरीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर ११ नोव्हेंबरला ते दोघेजण दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. देबिनाला अकरा वर्षांनी एप्रिल २०२२ मध्ये त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यानंतर लगेचच ११ नोव्हेंबर २०२२ ला देबिना दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर देबिनाने तिचा चेहरा दाखवला नव्हता. आता त्या दोघांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर २०११ मध्ये लग्न केले होते. ‘रामायण’मधील राम-सीतेच्या भूमिकेमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. लग्नाच्या ११ वर्षानंतर या जोडप्याला एप्रिल २०२२ मध्ये एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव लियाना असे ठेवले. त्यानंतर या जोडप्याला ६ नोव्हेंबर २०२२ रोजी देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा पालक झाले. त्यांनी त्यांच्या लहान मुलीचे नाव दिविशा ठेवले आहे.
आणखी वाचा : देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरीच्या दुसऱ्या लेकीचे नाव अखेर समोर, अर्थ आहे फारच खास

गुरमीत चौधरीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या लेकीचा चेहरा दाखवला आहे. “हाय वर्ल्ड! ही आमची मुलगी दिविशा आहे, असे त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे. त्या दोघांनी लेकीबरोबरच्या खास फोटोशूटचा एक फोटो पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये ते दोघेही बाळाच्या डोक्यावर किस करताना दिसत आहे. यावेळी पहिल्या फोटो त्यांच्या लेकीला पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले आहे. या कपड्यात ती फारच सुंदर दिसत आहे.

आणखी वाचा : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्यगीताचे दुसरं आणि तिसरं कडवं गायलं जाण्यावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले “किती सेकंदात…”

गुरमीतने निळ्या रंगाचा सूट-बूट परिधान केला आहे. तर देबिनानेही निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या दोन्हीही मुली दिसत आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे. तर दिविशा पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये परीसारखी सुंदर दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:37 IST